आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजमध्ये प्रेम, मग लग्न आणि नंतर पत्नीची निर्दयी हत्या; सात वर्षाच्या प्रेम कहानीचा भयानक अंत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेरठ(उत्तर प्रदेश) - मेरठ येथे गंगानगरमधील पनाश अपार्टमेंटमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. या घटनेमुळे भागात एकच खळबळ उडाली. त्यामुळे पोलिसांनी संशयित असलेला महिलेच्या पतीला अटक केली आहे. तसेच, चौकशीमध्ये आरोपीने अनेक खुलासे करून आपला गुन्हा कबूल केला.


सीओ अखिलेश भदौरियानुसार, परिक्षीतगडच्या शिवपुरी गावातील रहिवासी जसवीर भाटी आपल्या पत्नी पूजा भाटीसोबत (36) गंगानगरमधील पनाश अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील बी-403 फ्लॅटमध्ये किरायाने राहत होते. जसवीर कोर्टात क्लर्कचे काम करतात. जसवीर आणि पूजाचा सात वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता. सोमवारी साफ-सफाई करणारा सुशील  तिथे गेला असता फ्लॅटच्या आजूबाजूने दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना याची माहिती दिली.


चादरीमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
शेजाऱ्यांनी याचा तपास केला असता त्यांना कळाले की, फ्लॅट क्रं. 403 मधून दुर्गंध येत होता. शेजाऱ्यांनी लगेच याबाबत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहचलेल्या पोलीसांनी दरवाजाचे कुलूप तोडले आणि त्यांना बेडरूमध्ये महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आणि पुढील तपास सुरू केला आहे.

 

शनिवारी झाला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना सुरूवातीला महिलेच्या पतीवर संशय होता. त्यामुळे त्याची सर्व माहिती पोलिसांना गोळा केली. यादरम्यान शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता फ्लॅट दोन-तीन दिवसांपासून बंद असल्याचे पोलिसांना कळाले. त्यानंतर पोलिसांना जसवीरसोबत फोनवर बोलणी केली पण त्यांने घटनास्थळी येण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. आणि दुपारी तीन वाजता जसवीरला पोलिसांनी कोर्टातून अटक केली. सीओ यांनी दिलेल्या माहितीनुसार, जसवीरला आपल्या पत्नीवर संशय होता. त्यामुळे शनिवारी त्याने पत्नीचा खून केला होता.

 

खून केल्यानंतर मृतदेह चादरीत गुंडाळला  
पोलिसांनी आठ तास आरोपीची चौकशी केली. यात जसवीरने खूनासंबंधीची माहिती दिली. यामध्ये आरोपी सांगितले की, खून केल्यानंतर मृतदेह नदीत टाकण्याची योजना होती, पण एकटा असल्याने मृतदेह त्याला उचलता आला नाही. त्यामुळे मृतदेह तिथेच ठेऊन तो पळून गेला. आरोपीने पुढे सांगितले की, पत्नीला मारण्याची योजना मागील सहा महिन्यांपासून सुरू होती. अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी पत्नीचा खून करण्याचा त्याने प्रयत्न केला पण ती वाचली. त्यानंतर मागील शुक्रवारी दोघांनी होटलचे जेवन घरी आणून जेवण केले. पण सकाळी दोघांमध्ये विवाहबाह्य संबंधावरून कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे जसवीरने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह चादरीत गुंडाळला आणि तेथून पळ काढला.

 

पत्नीवर लावले गंभीर आरोप 
पोलिसांनुसार, जसवीरने आपल्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याने सांगितले की, पत्नीने कुटुंबापासून दूर केले होते आणि रूग्णालयात उपचार घेत असलेल्या माझ्या वडीलांनाही भेटू देत नव्हती. तिने स्पष्ट सांगितले की, तू कुटुंबाला भेटायचे नाही. त्यामुळे आमच्यातील वाद आणखी वाढला.


पोलिसांनी सांगितले की, हत्या केल्यानंतर जसवीर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या वडीलांना भेटायला गेला होता पण तिथे त्याने कोणत्याही गोष्टीचा उलघडा केला नाही. त्यानंतर तो आपल्या गावाकडे गेला आणि तेथील काही लोकांना भेटून परत आला. सोमवारी नियमितपणे कोर्टात आला आणि काम करू लागला.

 

सातवर्षीय प्रेम कहाणीचा करुण अंत

जसवीर सात वर्षापूर्वी एका कॉलेजमध्ये पुजासोबत भेट झाली होती. यादरम्यान दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण लग्नानंतर जसवीर दारू पिऊ लागला आणि आपली जमिनीची विक्री सुरू केली. त्यामुळे दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागला. जसवीरच्या अशा वागण्यामुळे दोघांनी गंगानगरमध्ये फ्लॅट घेऊन राहण्याचा निर्णय घेतला होता.