औरंगाबाद-मलकापूर चालत्या बसमध्ये / औरंगाबाद-मलकापूर चालत्या बसमध्ये महिलेचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू  

बसच्या चालक व वाहकाकडून साधे माणुसकीचे ही दर्शन नाही

प्रतिनिधी

Feb 21,2019 06:15:00 PM IST

फुलंब्री - औरंगाबाद-मलकापूर या चालत्या बसमध्ये फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्याजवळ अचानक महिलेला ह्दयविकाराचा झटका येऊन त्यातच महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान बसचे वाहक व चालक यांनी मृत्यू झालेल्या महिलेला व नातेवाईकांना रुग्णालयात सोडण्याऐवजी फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयासमोर भर रस्त्यावरच उतरवून पळ काढल्याची घटना आज गुरुवार दि.21 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बसचालक व वाहकाने बस रुग्णालयात नेण्याऐवजी मृत महिलेसह नातेवाईकांना रस्त्यावर उतरवून पळ काढल्याने माणुसकी जिवंत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेची फुलंब्री पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

पुंजाबाई भीमराव शिंदे वय 63 वर्ष रा.कोसगाव ता.भोकरदन जि. जालना असे चालत्या बसमध्ये ह्दयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.


बसचालक व वाहकाकडून माणुसकीचे दर्शन नाही
एक महिला ह्दयविकाराच्या झटक्याने चालत्या बसमध्ये मरण पावली त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्याऐवजी मृत महिलेसह नातेवाईक भर रस्त्यावरच उतरून दिले. त्याचबरोबर त्यांच्याजवळ असलेले बसचे तिकीट त्याच्याकडून घेतले व त्यांना भर रस्त्यावरच सोडून बस चालक व वाहक निघून गेले. त्यामुळे बसचालक व वाहक यांनी कमीतकमी मृत महिलेला रुग्णालयात दाखल करण्याची साधी माणुसकी ही दाखवली नाही. त्यामुळे खरेच माणुसकी जिवंत आहे का असा प्रश्न उपस्थित होतो.


कोसगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार
फुलंब्री येथून दुपारी दीड वाजेच्या सुमारास पुंजाबाई यांची उत्तरीय तपासणी करून रुग्णवाहेकव्दारे त्यांना पाठवण्यात आपले. कोसगाव येथे साडेतीन वाजेला त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

X
COMMENT