आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसुतीच्या वेदनेने ग्रस्त होती महिला, डॉक्टरांनी न बघताच पाठविले घरी; पण वाटेतच घडले असे काही की, डॉक्टरांची उडाली झोप

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दावनगेरे : कर्नाटकमध्ये प्रसुती वेदना सहन करणाऱ्या महिलेसोबत निष्काळजीपणा केल्याची घटना समोर आली आहे. 30 वर्षीय महिला आपल्या पतीसोबत गावातील एका हेल्थ सेंटरवर गेली होती. पण डॉक्टरांनी तिला न बघताच वाट पाहण्यास सांगितले. महिलेचा पती डॉक्टरांकडे विनवण्या करत होता. पण तरीही डॉक्टरांनी तिला न पाहताच घरी हाकलून दिले. घरी परतत असताना महिलेची वाटेतच प्रसुती झाली. या प्रकरणानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नीरज पाटील यांनी हेल्थ सेंटरविरोधात चौकशी करण्यास सुरूवात केली आहे. 
 
डॉक्टरांनी न तपासताच पाठविले घरी

- चित्रदुर्गा जिल्ह्यातील घटना आहे. येथील एका गावातील 30 वर्षीय गंगा मलम्माला प्रसुती वेदनेने ग्रस्त होती. त्यामुळे ती आपल्या पतीसोबत गावातील एका हेल्थ सेंटरमध्ये दाखल झाली. पण तेथे पोहोचल्यानंतर तेथील ड्यूटीवर असलेल्या डॉक्टर्स आणि नर्सने त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. 

- सोमवारी सकाळी 11 वाजता मी माझ्या पत्नीला घेऊन रूग्णायलात गेलो होतो. पण तेथील डॉक्टरांनी जेवणाच्या वेळेपर्यंत वाट पाहण्यास सांगितली आणि नंतर न तपासताच घरी जाण्यास सांगितले असल्याचे गंगाचे पती चाउदप्पा यांनी सांगितले. 

- गंगाला वेदनेने ग्रस्त होती पण दोघांनी नाईलाजाने घरी परतावे लागले. पण वाटेतच तिच्या वेदनेत वाढ झाली आणि गंगा वर्दळीच्या ठिकाणीच रस्त्यावरच प्रसुतीसाठी आडवी झाली. 

- यानंतर गावातील महिलांनी मदतीसाठी धाव घेतली आणि त्यांनीच गंगाची प्रसुती पार पाडली. 
 
 
 आता आरोग्य विभागाची उडाली झोप

या सर्व प्रकारानंतर चाउदप्पाने तक्रार केल्यानंतर आरोग्य विभागाला जाग आली. जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी नीरज पाटील यांनी गावातील हेल्थ सेंटर आणि कामात कुचराई करणाऱ्या डॉक्टरांविरुद्धी चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. डिप्टी कमिश्नर यांच्याकडे लवकरच या प्रकरणाचा अहवाल देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...