आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Died After Bursting Into Flames Poured Petrol Over Herself Because Of Her Husband Affair

6 महिन्यांपासून पती-पत्नीत व्हायचे वाद, एके दिवशी वाद इतका शिगेला पोहोचला की पत्नीने रागाच्या भरात स्वतःवर ओतून घेतले पेट्रोल; पण नंतर आली ही वेळ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीसाइड -  इंग्लंडमध्ये एका महिलेने आपल्या फसव्या पतीस घाबरवण्यासाठी स्वतःवर पेट्रोल शिंपडुन घेतले. पण यादरम्यान असे काही झाले की, काही मिनिटातच ती आगीच्या गोळ्यात बदलली. पतीने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला रूग्णालयात दाखल आणि तिच्यावर उपचार सुरु केले. पण शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने तिचा 4 दिवसांतच मृत्यू झाला. 


पतीच्या अफेयरबाबत खुलास्यामुळे बिगडली गोष्ट 

> सदरील घटना 13 नोव्हेंबर रोजी टीसाइड शहरात घडली. 35 वर्षीय अमरीनचे आपल्या पतीसोबत कोणत्यातरी गोष्टीवरून भांडण झाले. यामुळे तिने रागाच्या भरात स्वतःवर पेट्रोल ओतून घेतले. 

> यानंतर तिने स्वतःला आगीच्या स्वाधीन केले. समोर आलेल्या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अमरीन पेट्रोल ओतून घेताना आणि हातात एक पेपरचा तुकडा पकडलेली दिसत आहे. 

> काही क्षणातच तिला संपूर्ण शरीराला आग लागली. पण तिच्या शरीरावर आग कागदाच्या तुकड्याने लागली की इतर कोणत्या गोष्टीने हे फुटेजमध्ये दिसले नाही. 

> तर फुटेजमध्ये तिचा पती मुबीन आग पाहताच तिच्याकडे धाव घेताना दिसत आहे. तो त्याच्या हाताने आग विझविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यानंतर शेजारी देखील त्याच्या मदतीसाठी तेथे दाखल झाले.  

> मुबीनने कोर्टात सांगितले की, मी रिकाम्या हाताने आग विझविण्याचा प्रयत्न करत होतो. तिच्या बोलण्यावरून मला वाटले नाही की ती स्वतःला पेटवून घेईल. मला वाटलं ती फक्त घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. 

 

महिला स्वतः आहे स्वतःच्या मृत्यूला कारणीभूत  

> घटनेचा तपास करणारी असिस्टेंट कोरोनर जो व्हॉर्टन यांचे म्हणणे आहे की, अमरीनला बायको, आई आणि मुलगी म्हणून परिवाराकडून खूप प्रेम मिळत होते. 6 महिन्यांपूर्वी मुबीनचे अफेयर समोर येताच पती-पत्नीमधील संबंध बिघडण्यास सुरुवात झाली. 
 
> कोरोनरने पोलिस स्टेटमेंटमध्ये सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे काहीच दिसत नाहीये की अमरीन पेपरच्या तुकड्यात लागलेल्या आगीच्या संपर्कात आली. तिचा मृत्यू एक अपघात आहे. यासाठी ती स्वतः जबाबदार आहे. 

बातम्या आणखी आहेत...