आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Died After Delivery In Shock In Chhatrapur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिलीव्हरीनंतर सुखरूप होते आई व बाळ, नर्सिंग स्टाफचे बोलणे ऐकुण बसला धक्का, काही वेळेनंतर झाला मृत्यु...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छतरपूर(मध्यप्रदेश)- 29 वर्षीय महिलेची महाराजपूर रूग्णलयात डिलीव्हरी झाली. डिलीव्हरीनंतर तिला कळाले की, तिला मुलगी झाली आहे, त्यामुळे तिला धक्का बसला. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात आणले, तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यु झाला. खरतच महिलेला धक्का यामुळे बसला कारण, तिला आधीच 4 मुली होत्या आणि ही पाचवी मुलगी झाली. 


मिळालेल्या माहितीनुसार, महाराजपूर परिसरातील कालीचरण पाल यांची 29 वर्षीय पत्नी रामदेवी यांना प्रसुती वेदना सुरू झाल्या. कुटुंबींयांनी तिला महाराजपूर रूग्णालयात घेऊन गेले, तेथे तिला पाचवी मुलगी झाली. नर्सिंग स्टाफने तिला मुलगी झाल्याची बातमी दिली, त्यानंत लगेच तिची तब्येत खराब होऊ लागली. त्यानंतर कुटुंबींयांनी तिला जिल्हा रूग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले पण काही वेळानंतर तिने प्राण सोडले.


पाचवी मुलगी झाल्याचा बसला धक्का
महिलेचा पती कालीचरण याने सांगितले की, रामदेवीसोबत त्याचे लग्न 10 वर्षांपूर्वी झाले होते, आणि त्यांना चार मुली होत्या. त्यापैकी तिसऱ्या नंबरच्या मुलीचा जन्म झाल्याच्या काही दिवसांतच मृत्यु झाला. रविवारी प्रसुती नंतर तिला वाटले की, मुलगा झाला असेल पण झाली मुलगी त्यामुळे तिला धक्का बसला आणि त्यातच तिचा मृत्यु झाला.