आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिसार (हरियाणा) - येथील एक विवाहिता हुंडाबळीची शिकार झाली. हुंड्याची मागणी पूर्ण न करू शकल्यामुळे सासरच्यांनी 22 वर्षीय गरोदर महिलेची गळा आवळून हत्या करण्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. मृतदेहाला नष्ट करण्याच्या उद्देशाने स्मशानभूमीत घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. तेथे चिता रचून त्यावर मृतदेह ठेवण्यात आला होता. पण मुखाग्नि देण्यापूर्वीच मृत महिलेचा भाऊ तेथे पोहोचला. नातेवाईंकांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवला. नीतूच्या गळ्यावरील जखमांचे वण पाहून पती आणि सासऱ्याला विचारपूस केली असता त्यांनी तेथून पळ काढला. यानंतर पोलिसांना तेथे पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेहाला ताब्यात घेऊन तो सिविल हॉस्पीटलमधील शवगृहात ठेवले आहे.
महिलेच्या बोलण्यावर माहेरच्यांनी केले दुर्लक्ष
मृत महिलेचा भाऊ बिमलेशच्या तक्रारीवरून पती कुलदीप, सासरा राधेश्याम, सासू श्यामा देवी आणि नणंद पूजा यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या एक दिवस आधी नीतूने भाऊ बिमलेशला फोन करून सासरवरून घेऊन जाण्यास सांगितले होते. सासरचे लोक मला मारणार असल्याचे तिने सांगितले होते. यानंतरही भाऊ आणि तिच्या घरच्यांना या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते.
भाऊ म्हणाला - बुधवारीच बहिणीचा फोन आला होता
नीतूचा विवाह 27 एप्रिल 2018 रोजी कुलदीपसोबत झाला होता. ती दोन महिन्यांची गरोदर होती. लग्नानंतर हुंड्यासाठी तिचा छळ करण्यात येत होता. आम्ही आमच्या ऐपतीनुसार त्यांची प्रत्येक मागणी आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. पण त्यांच्या मागणी वाढतच जात होती. बुधवारी माझा नातेवाईक राहुलला नीतूचा फोन आला होता. तिने सांगितले की, पती आणि सासरचे लोक हुंड्यासाठी तिचा छळ करत आहेत. यावर तिला समजावून सांगितले की, तू चिंता करू नको मी तुला लवकर घ्यायला येतो. ती म्हणाली की, लवकर ये....अन्यथा हे माझा जीव घेतील.
> महिलेचा गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणात मृत महिलेचा पती, सासू व सासऱ्यासह इतर लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना शोध सुरु असून लवकरात लवकर पकडण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.