आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉयफ्रेंडच्‍या शोधात होती तरूणी, सोशल मीडियावर दिले इन्व्हिटेशन, भेटण्‍यासाठी आले 200 तरूण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्‍यूयॉर्क - अमेरिकेमध्‍ये एका तरूणाने सोशल मीडियावर आपल्‍या डेटिंगची अनोखी कहाणी पोस्‍ट केली आहे. ती सध्‍या चांगलीच व्‍हायरल होत आहे. तरूणाने सांगितले की, डेटिंग साईट टिंडरवर स्‍वत:साठी बॉयफ्रेंड शोधणा-या तरूणीने त्‍याला ब्‍लाइंड डेटचे इन्‍व्‍हीटेशन दिले. कधी व कुठे भेटायचे हे तरूणीने सांगितले. मात्र तरूण जेव्‍हा तिला भेटण्‍यासाठी गेला, तेव्‍हा तेथे तरूणांची गर्दी पाहून तो काहीसा गोंधळला. नंतर त्‍याला समजले की, या तरूणीनेच या 200 युवकांना डेटिंगसाठी बोलावले होते आणि यांच्‍यामधूनच ती परफेक्‍ट पार्टनरची निवड करणार होती.


ब्‍लाइंड डेटचे दिले इन्व्हिटेशन
- @bvdhai नावाच्‍या हँडलरने हा किस्‍सा शेअर केला आहे. त्‍याने सांगितले की, टिंडरवर एका तरूणीची भेट झाली व नंतर दोघांनीही एकमेकांचे मोबाईल नंबर शेअर केले.
- तरूणाने सांगितले की, मुलीने स्‍वत:चे नाव नताशा एपोंटे असे सांगितले होते. तिच्‍या प्रोफाईलमध्‍ये ती अॅक्‍ट्रेस, मॉडेल, सिंगर आणि एक ट्रॅव्‍हलर असल्‍याचे तिने म्‍हटले होते.
- काही दिवसांच्‍या ओळखीनंतरच तरूणीने मला ब्‍लांइड डेटचे इन्व्हिटेशन दिले. यासाठी मला न्‍यूयॉर्क सिटीतील यूनियन स्‍क्‍वेअर पार्कवर तरूणीने बोलावले होते, असे तरूणाने सांगितले.
- आपण डेटिंग साईटवर पोहोचलो तेव्‍हा आपल्‍याला तेथील दृश्‍य पाहून धक्‍काच बसला. कारण तिला डेट करण्‍यासाठी माझ्यासारखेच आणखी 200 तरूण आले होते, असे तरूणाने सांगितले आहे.


घटनास्‍थळी असा होता नजारा
- तरूणाने सांगितले की, स्‍क्‍वेअर पार्कवर डिजेचा पुर्ण सेटअप लावण्‍यात आला होता. थोड्यावेळानंतर तरूणी आपल्‍या दोन बॉडीगार्डसोबत तेथे आली व सर्व तरूणांना जमा करू लागली.
- तरूणाने दिलेल्‍या माहितीनूसार, एका कॉम्पिटीशनद्वारे तरूणी सर्व तरूणांमधून बेस्‍ट पार्टनर म्‍हणून एकाची निवड करणार होती.
- तरूणाने सांगितले की, काही युवक यामुळे निराश झाले व ते तसेच तेथून निघून गेले.


या घटनेचा ट्रम्‍प यांच्‍याशीही आहे संबंध
- तरूणीला डेट करण्‍यासाठी तिने युवकांसमोर काही अटी ठेवल्‍या होत्‍या. त्‍यानूसार लांब दाढी असणारे आणि डोनाल्‍ड ट्रम्‍पचे फॉलोअर्स तिला डेट करू शकणार नव्‍हते.
- डेटींगसाठी युवकांना पुशअप्‍स आणि रेसिंग करण्‍यास सांगण्‍यात आले होते. आणि शेवटी आपल्‍याला तरूणीसोबत डेट का करायचे आहे? या प्रश्‍नाचे उत्‍तर त्‍यांना द्यायचे होते.
- या घटनेचा एक व्हिडिओही व्‍हायरल झाला असून त्‍यामध्‍ये केवळ 10 युवकांनी कॉम्पिटीशनमध्‍ये भाग घेतल्‍याचे दिसत आहे. त्‍यानंतर नेमक्‍या कोणत्‍या युवकाला तरूणीला डेट करण्‍याची संधी मिळाली, हे मात्र अद्याप समजू शकले नाही.   

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, घटनास्‍थळावरील दृश्‍य...

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...