Home | National | Other State | woman eloped with future son in law after bride refused to marry in kanpur

लग्न मंडपात मुलीने दिला नकार, मग होणाऱ्या जावयाचा हात धरून सासूच झाली फरार!

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 12, 2019, 03:21 PM IST

जावयाची समजूत काढताना ती इतकी भावूक झाली की स्वतःच केले लग्न

 • woman eloped with future son in law after bride refused to marry in kanpur

  कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात एक अजबच घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका लग्नसमारंभात ऐनवेळी वधूने लग्नासाठी नकार दिला. सर्व काही सुरळीत होते. परंतु, वधूने होणाऱ्या पतीचा चेहरा पाहताच वरमाला फेकून दिली. तसेच आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. त्या मुलीच्या आईसह समस्त कुटुंबियांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, तिने कुणाचे काहीच ऐकले नाही. मग, जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसेनासे झाले. मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर तिची आईच चक्क आपल्या होणाऱ्या जावयासोबत पसार झाली. ही घटना कानपूरच्या सचेंडी, भिसार गावात घडली आहे.


  अल्पवयीन होती मुलगी...
  भिसार गावात एका 17 वर्षांच्या मुलीने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली. तिच्या आईने तिचा विवाह आग्रा येथे राहणाऱ्या आपल्या चुलत नणदच्या मुलाशी निश्चित केला होता. 10 मार्च रोजी ठरल्याप्रमाणे नवरदेव वऱ्हाड घेऊन तिच्या घरी पोहोचला. परंतु, ऐनवेळी मुलीने लग्नास नकार दिला. आपल्याला जो फोटो दाखवून मंजुरी मिळवली तो दुसऱ्याच तरुणाचा होता. आता लग्नात आलेला माणूस आपल्यापेक्षा दुप्पट वयाचा असल्याचे तिने सांगितले. अशा स्वरुपाच्या फसवणुकीनंतर या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असे मुलीने स्पष्ट केले. लग्नमंडपात खूप मोठा वाद झाला. मुलगी लग्नाच्या मंडपातून बाहेर पडली. सगळेच तिला समजावून सांगत होते.


  मग सकाळी होणाऱ्या जावयासोबत पळाली मुलीची आई
  मुलीने नकार दिल्यानंतर लग्न रद्द करण्यात आले. सगळेच आप-आपल्या घरी निघाले. परंतु, दुसऱ्याच दिवशी मुलीच्या आईने सर्वांना धक्का दिला. ती आपल्या होणाऱ्या जावयासोबत आग्रा येथे पसार झाली. मुलीने सांगितल्याप्रमाणे, तीन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले होते. ती घरातील सर्वात मोठी मुलगी होती. तिला एक भाऊ आणि बहिण सुद्धा आहेत. यानंतर नातेवाइकांनी चौकशी केली तेव्हा मुलीच्या आईलाच तो मुलगा पसंत होता असे समोर आले. आपल्या मुलीने नकार दिल्यानंतर तिला त्या मुलावर दया आली होती. त्याच दरम्यान तिने स्वतःच त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.


  पोलिस काय म्हणाले?
  स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, अद्याप यासंदर्भात कुठल्याही स्वरुपाची तक्रार आलेली नाही. कंट्रोल रुमला एका मुलीसोबत तिच्या वयाच्या दुप्पट मुलाचा विवाह करून दिला जात आहे अशी माहिती मिळाली होती. ती मुलगी खरोखर अल्पवयीन असल्यास आणि तिने याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास पुढील चौकशी केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

Trending