आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman Experienced Chartered Plane There Was No Other Passenger

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाइट फ्लाइटमध्ये मुलीने एकटीने केला प्रवास, क्रू मेंबर्ससोबत घेतला सेल्फी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानाने प्रवास करणे आणि चार्टर्ड प्लेनने एकट्याने प्रवास करण्यात खुप फरक असतो. विमान प्रवास करताना तुमच्या सोबतच्या सीटवर एखादा प्रवासी बसलेला असतो. यासोबतच इतरही प्रवासी असतात. तर चार्टर्ड प्लेनमध्ये एक किंवा तुमच्या खुप जवळचे लोक प्रवास करत असतात. चार्टर्ड प्लेनमध्ये प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. पण हे पुर्ण होऊ शकत नाही.

 

जर कुणी कमर्शियल प्लेनमधून एकट्याने प्रवास करण्याचा विचार केला तर ही इच्छा पुर्ण होणे अवघड असते. पण लोइसा एरिस्पे नावाच्या महिलेलेने कमर्शियल फ्लाइटच्या किंमतीत हे स्वप्न पुर्ण केले. खरेतर लोइसा दवाओ येथून मनीला जाण्यासाठी फिलीपींस एयरपोर्टवर पीआर2020 फ्लाइट पकडण्यासाठी पोहोचली. 


हा प्रवास तिच्यासाठी आठवणीतला असेल हे तिला माहिती नव्हते. तिने विमानात प्रवास केला तेव्हा फ्लाइटमध्ये तिच्याशिवाय एकही पॅसेंजर नव्हता. फ्लाइटमध्ये तिच्यासोबत फक्त अटेंडेंट आणि पायलट होते. ही रात्रीची फ्लाइट होती आणि यामध्ये फक्त 7 क्रू मेंबर्स होते. 
लोइसाने रिकाम्या विमानाचा एक फोटो घेतला. हा फोटो लोइसाने फेसबुकवरही शेअर केला. यासोबतच तिने क्रू मेंबर्ससोबत घेतलेला सेल्फीही शेअर केला. मनीला उतरली तेव्हा कनवेयर बेल्टही फक्त तिच्या लगेजचे होते. यापुर्वीही एका कैरन ग्रीव नवाच्या महिलेला असाच एकटीने प्रवास करण्याची संधी मिळाली होती.