Home | Khabrein Jara Hat Ke | woman facebook lives own x rated video while recording for husband in a huge mistake

पतीला पाठवण्यासाठी न्यूड व्हिडिओ बनवत होती महिला, एक चूक आणि हजारो लोकांनी पाहिले थेट प्रक्षेपण

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 17, 2019, 12:01 AM IST

घरापासून दूर राहणाऱ्या मुलानेही पाहिला व्हिडिओ, आता परतणार नाही

 • woman facebook lives own x rated video while recording for husband in a huge mistake

  सोफिया - स्मार्टफोनमध्ये अपघातानेच झालेल्या एका चुकीमुळे अख्खे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. एक चूक आणि तुमचे खासगी आयुष्य सार्वजनिक... बुल्गारियातील अशीच एक चूक महिलेला महागात पडली. तिचा घरापासून दूर होता. त्यालाच ही महिला आपला न्यूड व्हिडिओ पाठवणार होती. तिने मोबाईलचा कॅमेरा ऑन केला आणि घाई गर्दीत तिच्याकडून टच स्क्रीनवर वेगळेच बटन दाबल्या गेले. यानंतर तो व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड झाला नाही, तर त्याचे थेट प्रक्षेपण झाले. फेसबूकवर तिचे आणि तिच्या पतीचे 2000 मित्र होते. त्या सर्वांनीच तिचा न्यूड व्हिडिओ लाइव्ह पाहिला.


  फेसबुक स्टोरीच्या स्वरुपात झाला अपलोड
  महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिचा पती ब्रिटनमध्ये काम करतो आणि ती बुल्गारियात राहते. या दुराव्यात ते एकमेकांना खूप मिस करतात. आपल्या पतीसोबत खासगी गप्पा गोष्टी करत असताना ती आपल्या पतीला न्यूड सेल्फी आणि व्हिडिओ पाठवत असते. अशाच एका दिवशी तिने आपल्या पतीसाठी व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. परंतु, चुकून तो व्हिडिओ फेसबूक लाइव्ह झाला आणि फेसबूक स्टोरीच्या स्वरुपात अपलोड देखील झाला. हजारो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर दोघांचे इतके भांडण झाले की पतीने बोलणेच बंद केले.


  घरापासून दूर राहणाऱ्या मुलानेही पाहिला...
  मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या महिलेचा 20 वर्षांचा मुलगा महाविद्यालयीन शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात राहतो. ज्या दिवशी महिलेच्या हातून चुकून फेसबूक लाइव्ह झाले त्या दिवशी तिच्या मुलाने सुद्धा तो व्हिडिओ पाहिला. तेव्हापासूनच तिचा मुलगा सुद्धा तिला बोलत नाही. सोबतच, त्याने आता कधीच घरी परतणार नाही असे स्पष्ट केले आहे. आईला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर घरी पोहोचू शकणार नाही. किमान 5 वर्षे आईचा सामना करताच येणार नाही असे त्याने म्हटले आहे.

Trending