आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक महिला google street view वर आपले जुने घर पाहात असताना दिसली घराबाहेर बसलेली आई; हे बघताच महिलेला बसला धक्का, कारण 4 वर्षांपूर्वी झाले होते आईचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ताइपे - तैवानमध्ये एक महिला google street view वर तिच्या आईला पाहून भावनिक झाली. एक दिवस महिला google street view वर तिचे जुने घर पाहात होती. अचानक तिला तिची आई घराबाहेर बसलेली दिसली. तिला वाटले की तिची आई खरंच तिथे बसलेली आहे कारण 4 वर्षांपूर्वी कँसरमुळे तिच्या आईचे निधन झाले होते. Street view वर लावलेला हा फोटो आईच्या हयात असताना गूगलच्या टीमने घेतला होता. महिलेने त्याचा स्नॅपशॉट काढून फेसबुकवर शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

आईला पाहताच डोळ्यात दाटून आले अश्रू
> तैवानमध्ये राहणाऱ्या डॅनी वू यांना एक दिवस तिच्या जुन्या घराची आठवण झाली. तिने Google street view वर आपले घर शोधण्यास सुरवात केली, घर सापडताच तिला मोठा धक्का बसला.
> Street view मध्ये तिला तिच्या जुन्या घरासोबत घरासमोर आई बसलेली दिसली. आई दिसताच भावनिक होऊन तिला रडू आले.
> तिने स्नॅपशॉट काढून शेअर करत सांगितले की, मी google street view वर माझे घर शोधत होते आणि मला तिथे माझी आई दिसली. आई आम्हाला तुझी खूप आठवण येत आहे अशा शब्दांत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
> डॅनीने सांगितले की सप्टेंबर 2014 मध्ये कॉलोन कर्करोगाने तिच्या आईचे निधन झाले. पण Street view वर घराच्या बाहेर त्यांनी पाहून धक्काच बसला. असे वाटले की आई आमच्यासोबतच आहे.

 

युझर्स देखील झाले भावनिक
> डॅनीच्या या भावनिक पोस्टमुळे सोशल मीडियावर बऱ्याच वापरकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. काही युझर्संनी त्यांनी देखील Google street view वर त्यांच्या घरच्यांना पाहिल्याचे फोटो शेअर केले.

बातम्या आणखी आहेत...