Home | Khabrein Jara Hat Ke | woman finds man slept with her was not her husband, files rape complaint in mumbai

पती समजून रात्र घालवली, सकाळी पाहिले तर बेडवर होता दुसराच; मुंबईतील महिलेची तक्रार ऐकूण पोलिसही Shock

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 15, 2018, 04:29 PM IST

महिलेने सांगितल्याप्रमाणे, तो तिला आपला पतीच वाटला. त्यामुळे, तिने काहीच विरोध केला नाही.

 • woman finds man slept with her was not her husband, files rape complaint in mumbai

  मुंबई - येथील पवई परिसरात राहणाऱ्या एका महिलेची तक्रार ऐकूण पोलिस सुद्धा हैराण आहेत. तिने सांगितलेल्या घटनेवर सुरुवातीला लोकांना विश्वासच बसला नाही. तिच्या तक्रारीनुसार, घरातील सर्वच कामे आटोपून ती बेडरुममध्ये आली आणि लाइट बंद करून झोपी गेली. यानंतर तिच्या बेडवर एक व्यक्ती आला. तिला ती व्यक्ती आपला पती असल्याचा भास झाला. त्या दोघांनी शारीरिक संबंध बनवले. यानंतर भल्या पहाटे त्या व्यक्तीने रुमची लाइट ऑन केली. यानंतर त्याचा चेहरा पाहिला तेव्हा महिलेला झटकाच बसला. ती व्यक्ती तिचा पती नसून एक अनोळखी माणूस होता. तिने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.


  पोलिसही हैराण...
  ही घटना मुंबईतील पवई येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार, रुमचे लाइट बंद करून ती आराम करण्यासाठी बेडवर पडली होती. त्याचवेळी हलक्या झोपेत असताना विश्वनाथ कोकिन तिच्या रुममध्ये घुसला आणि आंधाराचा गैरफायदा घेत तिच्या बेडवर शेजारीच झोपला. महिलेने सांगितल्याप्रमाणे, तिला विश्वनाथ आपला पती असल्याचा भास झाला होता. त्यामुळेच, तिने शारीरिक संबंधांना विरोध केला नाही. उलट पती असल्याचे वाटल्याने त्याची आपणही साथ दिली असे ती म्हणाली.


  लाइट ऑन करून कपडे घातले, आणि निघून गेला...
  महिलेने पुढे सांगितले, की "विश्वनाथने यानंतर भल्या पहाटे रुमची लाइट सुरू केली. तसेच कपडे घालत होता. त्याचा चेहरा पाहून माझ्या पायाखालची जमीन घसरली. मी ज्याला पती समजत होते तो दुसराच निघाला." सकाळीच या महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी तक्रार घेऊन आरोपीला अटक केले आहे. तसेच या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू आहे.

Trending