आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहाच्‍या 8 महिन्‍यानंतर समोर आले पतीचे भयानक सत्‍य, ऐकून तरूणीच्‍या पायाखालची जमिन सरकली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- पंजाबच्‍या लुधियानामधून एक अस्‍वस्‍थ करणारे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणाला अतिशय गंभीरतेने घेणे गरजेचे आहे. कारण हे कोणासोबतही होऊ शकते. डाबा रोडवरील फतेहपूर येथील तरूणीचे जानेवारीमध्‍ये लग्‍न झाले होते. मात्र लग्‍न करत असताना तरूणीला या गोष्‍टीची जराही कल्‍पना नव्‍हती की, ज्‍या तरूणासोबत ती सुखी आयुष्‍याचे स्‍वप्‍न पाहत आहे, तोच तिचे आयुष्‍य असे उद्ध्‍वस्‍त करणार आहे. ऐवढेच नव्‍हे तर तरूणीच्‍या कुटुंबियांनाही ज्‍या युवकाला आपण आपली मुलगी देत आहोत, तो ऐवढा मोठा विश्‍वासघातकी असेल, असे वाटले नव्‍हते.

 

युवक एचआयव्‍ही पॉझिटीव्‍ह आहे, हे धक्‍कादायक सत्‍य लग्‍नाच्‍या 8 महिन्‍यानंतर तरूणीला व तिच्‍या कुटुंबियाला कळाले. तोपर्यंत त्‍याने हे सत्‍य तरूणीपासून लपवून ठेवले होते. संतापजनक म्‍हणजे आपण एचआयव्‍ही पॉझिटीव्‍ह आहोत, हे माहिती असूनही त्‍याने तरूणीशी संग केला. यामुळे तरूणीला आता अनेक मानसिक आणि शारीरीक यातनांचा त्रास सहन करावा लागत आहे. ऐवढेच नव्‍हे तर हे सत्‍य उजेडात येण्‍यापूर्वी सासरच्‍यांनी तरूणीचा सतत 8 महिने हुंड्यासाठीही छळ केला.

 

मात्र युवकाचे सत्‍य उजेडात आल्‍यानंतर तरूणीने विश्‍वासघात आणि हुंड्यासाठी छळ केल्‍याप्रकरणी सासरच्‍या लोकांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. पोलिसांनीही गुन्‍हा नोंदवून घेत तपासाला सुरूवात केली आहे. मात्र अद्याप आरोपी युवकाला अटक करण्‍यात आलेली नाही. तक्रारीत तरूणीने सांगितले आहे की, तिचा पती एचआयव्‍ही पॉझिटीव्‍ह आहे, हे सास-याला माहित होते. मात्र त्‍यांनी सर्वांपासून हे लपवून ठेवले. तरूणीला जेव्‍हा याबाबत कळाले, तेव्‍हा तिने सास-यांशी बोलण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र उत्‍तर देण्‍याऐवजी त्‍यांनी मला शिवीगाळ केली, असा आरोप तरूणीने केला आहे.

बातम्या आणखी आहेत...