आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने ट्रेनच्या टॉयलेटमध्ये दिला बाळाला जन्म, नंतर बाळाला केले टॉयलेटमध्ये फ्लश, 12 तास पाइपमध्ये अडकून राहिले बाळ...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमृतसर- हावड़ा-अमृतसर मेलमध्ये शुक्रवारी रात्री बाळाला जन्म दिल्यानंतर आईने बाळाच्या गळ्यात ओढनी बांधून त्याला टॉयलेटमध्ये फ्लश केले. पण देवाच्या कृपेने ते बाळ फल्श झाले नाही आणि 12 तास ट्रेनच्या पाइपमध्ये अडकून राहिले. त्यानंतर दुपारी सफाई कर्मचाऱ्यांनी त्याला पाहिले आणि तत्काळ त्याला रूग्णलयात नेले. त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, त्यांनी आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण ती मिळाली नाही. त्या बाळाला वाचवणाऱ्या दोघांनी सांगितले की, बाळाला कोणी स्वीकारायला तयार नसेल तर ते बाळ आम्हाला द्यावे आम्ही त्याला वाढवू.


'ज्याला देव तारी त्याला कोण मारी'
'ज्याला देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण त्या बाळाच्या बाबतील एकदम तंतोतंत बसते. दुपारी दोन वाजता ट्रेन अमृतसर रेल्वे स्टेशनवर पोहचली. ट्रेन रिकामी झाल्यावर सफाईचे काम सुरू झाले. सफाई करताना कर्मचारी बोगी नंबर बी-3 मध्ये गेले तेव्हा त्यांला टॉयलेटच्या पाइपमध्ये काहीतरी अडकल्याचे दिसले, जवळ जाऊन पाहिले तर ते बाळ होते. त्यानंतर त्यांनी सावधानीने त्या बाळाला काढले, त्याचा श्वास सुरू होता पण थंडीमुळे त्याची प्रकृती खराब झाली होती. त्यानंतर त्याला जालियनवाला बाग मेमोरिएल हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे डॉक्टरांनी कुठल्याच प्रकारचा विलंब न करता त्या बाळावर उपचार सुरू केले आणि त्याचे प्राण वाचवले. यानंतर त्या बाळाला वाचवणारे कर्मचारी गुरूचरण सिंग साबी यांचा सन्मान करण्यात आला.


मध्यरात्री झाला बाळाचा जन्म
डॉक्टरांनी सांगितले की, बाळ पूर्ण दिवस झाल्यावर जन्मले आहे त्यामुळे ते एकदम हेल्दी आहे पण थंडीमुळे त्याची प्रकृती नाजुक आहे. त्यांनी सांगितले की बाळाचा जन्म मध्यारात्री झाला असावा. त्याच्या आईने त्याला मारण्याच्या हेतूने टॉयलेटमध्ये फ्लश केले पण पाइप छोटा असल्यामुळे तो अडकून बसला. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशा करत असून बाळाच्या आईचा शोध घेत आहेत. 


परवानगी मिळाली तर आम्ही त्याचे पालन करू 
बाळ आता ठिक असून डॉक्टरांच्या ऑबदर्वेशनमध्ये आहे, पण आता मोठा प्रश्न आहे की, त्याला स्वीकारणार कोण? यावर त्या बाळाला वाचवणारे गुरूचरण सिंग म्हणाले की, कोणीच त्याची जबाबदारी घ्यायला तयार नसेल तर मी आणि माझे साथीदार त्याचे संगोपन करायला तयार आहोत. 

 

बातम्या आणखी आहेत...