आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीसमोर पत्नीवर 6 जणांनी केला बलात्कार, हाता-पाया पडले म्हणून जीवंत सोडले अन्यथा जीवही घेतला असता

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्तोडगड - येथील बेगूं परिसरात 10 दिवसांपूर्वी एका दाम्पत्याबरोबर मारहाण आणि लुटालूट करणाऱ्या गुंडांनी अत्यंत क्रूर कृत्य केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार करणाऱ्या 6 गुंडांनी पतीसमोरच एकापाठोपाठ पत्नीवर बलात्कार केला. आरोपीने जर तक्रार केली तर जीवे मारण्याची धमकीही त्यांनी सर्वांना दिली. 


असे आहे संपूर्ण प्रकरण... 
भीतीपोटी दाम्पत्याने 10 दिवसांपर्यंत कोणालाही याबाबत सांगितले नाही. पण पोलिसांना मारहाण आणि चोरीची तक्रार दिली होती. याचदरम्यान 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली. गावकऱ्यांनीही साथ देत या दाम्पत्याला धीर दिला त्यानंतर त्यांना महिलेवरील बलात्काराचा वेगळा गुन्हा दाखल केला. त्यानंतर शुक्रवारी महिलेची वैद्यकीय चाचणी झाली. 

बाईकवरून जाताना या दाम्पत्याला 6 गुंडांनी अडवले होते. त्यांचे सोन्याचे दागिने, रोख पैसे लुटण्याबरोबरच महिलेवर बलात्कारही केला होता. त्यांना एवढी मारहाण करण्यात आली होती, की त्यांना श्वास घेता येत नव्हता. अंतर्गत जखमांमुळे ते रुग्णालयात दाखल होते. 


हाता-पाया पडले तेव्हा जीव वाचवू शकले 
पीडित दाम्पत्याने सांगितले की, गुंड रस्त्यापासून ओढत 100 मीटर अंतरावर त्यांना घेऊन गेले होते. त्याठिकाणी मारहाण आणि दुष्कृत्य केले. कोणाला आवाज देता येऊ नये म्हणून त्याचा गळाही दाबून ठेवला. पतीसमोर पत्नीवर 6 जणांनी एकापाठोपाठ बलात्कार केला. त्यानंतर पतीला गळा दाबून मारत होते, तेव्हा पत्नीने त्यांच्या हाता-पाया पडून पतीला वाचवले. 

 

बातम्या आणखी आहेत...