आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नेंसीविषयी समजल्यानंतर अवघ्या तीन तासांत या महिलेने दिला बाळाला जन्म, तीन वर्षांपूर्वी घेतलेल्या या निर्णयाने घडले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आम्ही तुम्हाला जे सांगणार आहोत, ते वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. आई होण्याचा अनुभव अतिशय खास असतो. गर्भाची वाढ होत असतानाचा नऊ महिन्यांतील प्रत्येक क्षण आईच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरत असतो. या नऊ महिन्यांच्या काळात होणा-या आईला वेगवेगळ्या इमोशन्समधून जावे लागते. नऊ महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर आईच्या हातात जेव्हा तिचे नवजात बाळ येते तेव्हा तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. पण आज आम्ही तुम्हाला अशा एका महिलेविषयी सांगतोय, जिची गोष्ट वाचून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल.

 

झाले असे की, ब्रिटनमध्ये राहणारी एमा प्रेसकॉट नावाच्या महिलेला तिच्या प्रेग्नेंसीविषयी तेव्हा कळतं, जेव्हा तिचे बाळ जन्म घेणार असते. होय तब्बल नऊ महिने या महिलेला ती गर्भवती आहे, हे ठाऊक नसतं. यामागे एक कारण आहे. पोटात अचानक तीव्र वेदना होत असल्याने एमा डॉक्टरांकडे जाते. तिने तीन वर्षांपूर्वी वेट लॉस सर्जरी केलेली असते. या सर्जरीचा साइड इफेक्ट म्हणजे तिच्या पोटातकायम दुखत असते. त्यामुळे नेहमीचे दुखणे समजून ती डॉक्टरांकडे जाते. डॉक्टरांनाही प्रथमदर्शनी वेट लॉसच्या सर्जरीमुळे तिला पोटात दुखत असावे, असे वाटते. पण जेव्हा डॉक्टर तिची सोनोग्राफी करतात तेव्हा ती गर्भवती असून हे दुखणे म्हणजे लेबर पेन असल्याचे त्यांना समजते. तसे डॉक्टर एमाला सांगतातही. हे कळल्यानंतर एमा तीन तासांत एका निरोगी बाळाला जन्म देते. आज एमा आणि तिचे बाळ निरोगी आयुष्य जगत आहेत.   

बातम्या आणखी आहेत...