आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंग्लंडमध्ये राहणारी एक महिला जेव्हा सायंकाळी घरी पोहोचली तेव्हा रोजप्रमाणे एक डॉगी तिला पाहून बाहेर आला. पण दुसरा डॉगी काही आला नाही. त्यानंतर महिला किचनमध्ये गेली तर त्याठिकाणी त्याची डेडबॉडी पडलेली होती. चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली होती. तिला वाटले चोराने हे केले असेल पण घरात चोरी झालेली नव्हती. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
- इंग्लंडमधील 21 वर्षीय सोफी डेव्हीसनच्या घरी यॉर्कशायर टेरियर प्रजातीचा पिपिन (11) आणि बॉक्सर बुलमॅस्टीफ प्रजातीचा टिया (13) हे दोन डॉगी होते.
- सोफी नुकतीच 29 डिसेंबरला दुपारी कामानिमित्त बाहेर गेली होती. सायंकाळी ती डॉगीजला जेवण देण्यासाठी घरी लवकर आली. पण परतताच टिया तिच्या पायाजवळ येऊन खेळू लागली पण पिपिन दिसत नव्हता.
- सोफी त्याला आवज देत शोधू लागली. किचनमध्ये घुसताच तिला त्याची डेडबॉडी दिसली. ते पाहून तिला जबर धक्का बसला.
- पिपिनच्या मानेवर घाव होते. रक्ताच्या थारोळ्यात त्याची डेडबॉडी पडलेली होती. अनेकदा चाकूने वार केल्याने भिंती दारावर रक्त उडालेले होते.
घरातून काहीही झाले नाही चोरी घर
- सोफीने पोलिसांना बोलावले. तिची शेजाऱ्यांशी फार ओळख नव्हती आणि कोणी शत्रूही नव्हता.
- चोरीसाठी आलेल्या एखाद्याने हे केले असेल असे तिला वाटले, पण घरातून काहीही गायबही झाले नव्हते.
- सोफी म्हणाली की, या घटनवेने तिला जबर धक्का बसला होता. ती कोलमडून गेली होती.
- सोफीने सोशल मीडियावर लोकांची मारेकऱ्याला पकडण्यासाठी मदत मागितली होती.
- सोफी सिंगल मदर आहे. ती सात महिन्यांच्या मुलासह एकटी राहते. त्यामुळे ती प्रचंड घाबरलेली आहे. काही महिन्यांपूर्वीच ती या नव्या घरात शिफ्ट झाली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.