आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने ३० मिनिटांत दिला ६ मुलांना जन्म; नवजातांचे वजन ४५० ते ७५० ग्रॅम होते, ५ दगावले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टर व परिचारिकांना फुटला घाम

श्योपूर- मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्हा रुग्णालयात एका महिलेने सुमारे ३० मिनिटांत ६ मुलांना जन्म दिला. यात ४ मुले व २ मुली होत्या. डॉक्टरांनी सांगितले, या मुलांचा जन्म मुदतीपूर्वीच झालेला आहे. यामुळे दोन मुली जन्मताच मृत होत्या, तर ३ मुले ८ तासांनी दगावली.  मुलांचे वजन ४५० ते ७५० ग्रॅमच्या जवळपास होते. एका मुलान सिक न्यूबॉर्न केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) ठेवले आहे. 


डॉक्टर व परिचारिकांना  फुटला
घाम

जिल्हा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी म्हटले, महिलेस प्रसूती वेदना जास्त येत होत्या. तिची सोनाेग्राफी करण्यात आली तेव्हा तिच्या गर्भात दोन-तीन नव्हे, तर ६ मुले आढळली. ते पाहून डॉक्टरांना व परिचारिकांनाच घाम फुटला. 

बातम्या आणखी आहेत...