Home | Khabrein Jara Hat Ke | Woman Gives Birth to six children at Texas

डिलिव्हरीसाठी रूग्णालयात पोहचली महिला, फक्त 9 मिनीटामध्ये 2-3 नाही तर इतक्या मुलांना दिला जन्म, डॉक्टर्सदेखील झाले हैराण...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 16, 2019, 05:10 PM IST

4.7 अब्जांमध्ये एखादीच केस असते अशी.

 • Woman Gives Birth to six children at Texas

  ह्यूस्टन- अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका महिलेने एकसोबत 6 बाळांना जन्म दिला, ज्याला पाहून डॉक्टरांनादेखील धक्का बसला. महिलेने फक्त 9 मिनीटात या बाळांना जन्म दिला, त्यात दोन मुली आणि चार मुले आहेत. त्यांचा जन्म द वुमन हॉस्पिटल ऑफ टेक्सासमध्ये झाला. डॉक्टरांनी सांगितल की, जगभरात 4.7 अब्जांमध्ये एक प्रकरण असे घडते.


  नाव काय ठेवावे कळत नाहीये
  - प्रकरण ह्यूस्टन शहरातील आहे. थेलमा चॅका नावाच्या महिलेने शुक्रवारी सकाळी 4.50 ते 4.59 या दरम्यान 6 बाळांना जन्म दिला.
  - थेलमाची प्रकृती सध्या स्तिर आहे. बाळांचे वजन एक पाउंड 12 ऑन्स( 800 ग्राम) ते दो पाउंड 14 ऑन्स(1.3 किलो) च्या दरम्यान आहे. सगळ्या बाळांची प्रकृतीदेखील स्तिर आहे, पण त्यांना नियोनॅटल इन्टेंसिव केअर यूनिटमध्ये निगराणीत ठेवले आहे.
  - थेलमाने आपल्या मुलींचे नाव जीना आणि जुरिअल ठेवले आहे, पण तिला आपल्या मुलांचे काय नाव ठेवावे हे कळत नाहीये.


  इराकच्या महिलेने 7 मुलांना दिला जन्म
  मागील महिन्यात इराकच्या एका 25 वर्षीय महिलेने 7 मुलांना जन्म दिला होता. या सातही मुलांची नैसर्गिक डिलिव्हरी झाली आहे.

Trending