Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | woman harassed in amravati, case registered against 5 people

सासूने सुनेला गुंगीच्या गोळ्या दिल्या, सासऱ्याने केला अत्याचार; 5 जणांविरुद्ध गुन्हा

प्रतिनिधी | Update - Aug 31, 2018, 10:56 AM IST

नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेला सासूने गुंगीचे औषध दिले, त्यानंतर भासऱ्याने अत्याचार केल्याचा

  • woman harassed in amravati, case registered against 5 people

    अमरावती - नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेला सासूने गुंगीचे औषध दिले, त्यानंतर भासऱ्याने अत्याचार केल्याचा खळबळजनक आरोप पीडीत महिलेने पोलिस तक्रारीत केला आहे. या प्रकरणी नागपूरी गेट पोलिसांनी पीडीतेच्या सासू, पती, सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.

    पीडीत महिलेचा काही महिन्यांपूर्वी शहरातील एका व्यक्तीसोबत विवाह झाला होता. त्यानंतर महिलेला पतीसह कुंटूबातील इतरांनी त्रास दिला. तसेच महिलेच्या पतीमध्ये शारिरिक दोष असल्याची बाब तिच्यापासून लपवून ठेवली असल्याचाही आरोप महिलेने केला आहे.


    दरम्यान, सासूने गुंगीचे औषध दिल्यानंतर सासऱ्याने अतिप्रसंग केला, असा आरोप पीडीतेने केला आहे. त्यानंतर सासरच्या मंडळींनी लग्नात आलेले सर्व दागिने व इतर साहित्य घरात ठेवून घेतले. ते परत मागितले असता दिले नाही, असेही पीडीतेने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी नागपूरी गेट पोलिसांनी बलात्कार, मारहाण, तसेच विवाहितेचा छळ करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे

Trending