आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 वर्षांच्या मुलीची साक्ष- आईने आज्जीच्या डोक्यात होतोडी मारून जिवंत जाळले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इटारसी(मध्यप्रदेश)- न्यास कॉलोनीतील झुग्गी परिसरात 27 डिसेंबरला झालेल्या हत्येत सुनेनी सासुला जिवंत जाळण्याआधी तिच्या डोक्यात होतोडी मारल्याचे समोर आलो, त्यात सासु बेशुद्ध झाली. त्यानंतर आरोपी सुनेने केरोसिन मृत कृष्णाबाई यादव यांच्या अंगावर टाकून आग लावली. नंतर जळणाऱ्या सासुला ओढत बाथरूमपर्यंत घेऊन गेली. सगळी घटना तिच्या तीन मुलींसमोर घडली. अरोपी महिलेच्या 11 वर्षांच्या मुलीने साक्ष दिली. रात्री पोलिसांनी अजय यादव याच्या तक्रारीवरून आरोपी पत्नी वर्षा यादव(32) वर मारहाण आणि हत्येचा गुन्हा नोंदवून अटक केले. शुक्रवारी तिला न्यायालयात सादर करण्यात आले आणि मुलीच्या साक्षीवरून तिला तुरूंगात टाकले.


मुलीने दिली साक्ष 
सकाळी अंदाजे 5 वाजता वडील कामासाठी वेअरहाउसला गेले. त्यानंतर आई आणि आज्जीत भांडण झाले. नंतर आईने घराचे दार बंद केले, टीव्हीचा आवाज वाढवला आणि आज्जीच्या डोक्यात होतोडी मारली, त्यात आज्जी बेशुद्ध पडली. त्यानंतर आईने केरोसिन टाकून आज्जीला जिवंत जाळले आणि ओढत बाथरूममध्ये घेऊन गेली. त्यानंतर तिने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

 

मुले झाली बेघर
आज्जी कृष्णाबाईच्या हत्येनंतर सुन वर्षा यादव तुरूंगात गेली. वडील अजयवर दोन मुली आणि एका मुलीची जबाबदारी आली. वडिलांनी मुले आणि पत्नीला सोबत ठेवण्यास नकार दिला त्यामुळे ती बेघर झाली. एसडीओपी उमेश द्विवेदीने सांगितले की, अजय खेडाच्या एका वेअरहाऊसमध्ये काम करतो. तिघांना एका संस्थेत ठेवण्यात आले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...