Home | Khabrein Jara Hat Ke | Woman horrified by mold in her coffee maker

अनेक महिन्यांपासून कॉफी पिल्यानंतर वाटत होते अस्वस्थ, कळत नव्हते कारण, एक दिवस महिलेने उघडताच तिला बसला धक्का

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 25, 2019, 04:44 PM IST

मशीन उघडल्यावर तोंडून निघाला एकच शब्द...

 • Woman horrified by mold in her coffee maker

  मिशिगन- अमेरिकेमध्ये राहणाऱ्या एका महिलेला कॉफी प्यायची खूप आवड होती. दिवसाची सुरूवातच ती आपल्या हाताने बनवलेल्या गरमा-गरम कॉफी घेऊन करायची. पण काही महिन्यापासून सकाळची कॉफी पिल्यावर तिला अस्वस्थ वाटत होते. तोंडाची चव जाणे आणि बऱ्याच वेळेस उल्टी होत असल्याचे तिला जाणवत होते. एकेदिवशी यामागचे कारण जाणून घेण्यासाठी तिने कॉफी मशीन उघडून पाहिले तर तिला धक्काच बसला.


  यामुळे वाटत होते उल्टी झाल्यासारखे...

  ही घटना अमेरिकेतील मिशिगन भागात राहणाऱ्या स्टेफनी ब्राउन्स या महिलेची आहे. स्टेफनीला सकाळी उठल्यावर आपल्या हाताने बनवलेली गरमागरम कॉफी पिण्याची सवय होती. महिलेनुसार मागील काही महिन्यांपासून तिला कॉफी पिल्यावर वेगळाच अनुभव येत होता. खूप दिवस या समस्येला सहन केल्यानंतर एक दिवस तिच्या मित्राने तिला कॉफी मशीन तपासण्याचा सल्ला दिला. मित्राचा सल्ला ऐकून स्टेफनीने आपली कॉफी मशीन उघडून याचे कारण शोधण्याचा निर्णय घेतला. महिलेने जेव्हा मशीन उघडली तेव्हा आतील दृश्य पाहून ती घाबरली. ती म्हणाली की, मी अनेक दिवसांपासून स्वतःच्या आरोग्याशी खेळत होते.


  तोंडातून निघाला फक्त एकच शब्द

  मशीन उघडताच स्टेफनीला मशीनमध्ये अनेक वर्षांपासून साचलेली घाण दिसली. खरंतर काही वर्षांपासून सफाई न झाल्यामुळे त्यात फक्त कॅल्शिअमचा मोठा थरच नाही तर पिवळ्या आणि तपकिरी रंगाची बुरशी साचली होती. हे दृश्य पाहताच तिच्या तोंडून हे किती भयानक आहे असे उद्गार निघाले. स्टेफनीने सांगितले की, कॉफी मशीन उघडताच आतील घाण बघून मला धक्का बसला. आता स्टेफनी इतर लोकांना कॉफी मशीनच्या साफ-सफाई आणि हायजिन बाबतीत जागरूक करत आहे. स्टेफनी लोकांना त्यांच्या मशीनचे युझर मॅन्युअल संभाळून ठेवण्याचे आणि उघडण्याचे पद्धत शिकण्याबाबत सांगत आहे.

Trending