आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Woman In Coma For Over 14 Years Gives Birth To A Child

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रूग्णालयात 14 वर्षांपासून कोमात असलेली महिला झाली प्रेग्नेंट, महिलेवर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अॅरिझोना : येथील एका रूग्णालयात एक महिला 14 वर्षांपासून कोमात गेलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही महिला कोमात असताना देखील प्रेग्नेंट झाली आहे. यामुळे रूग्णालयातील डॉक्टर्स हैराण झाले आहेत. स्थानिक मीडियाच्या मते एका अपघातानंतर येथे या महिलेला भर्ती करण्यात आले होते. या महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही

 

कोमात असतानाच बाळाला दिला जन्म

सदरील घटना अमेरिकेतील फीनिक्स अॅरिझोना येथील आहे. येथे एका महिलेने 29 डिसेंबर 2018 रोजी एका निरोगी बाळाला जन्म दिला आहे. हैराण करणारी गोष्ट म्हणजे बाळाचा जन्म होईपर्यंत महिला प्रेग्नेंट असल्याची कोणालाही माहिती नव्हती. रिपोर्ट्सनुसार ही महिला गेल्या 14 वर्षांपासून कोमात आहे.  

 

यौन शोषण झाल्याचा पोलिसांना संशय

हे प्रकरण पोलिसांकडे गेले असताना कोमात असलेली महिला प्रेग्नेंट झाली ही गोष्ट माहीत झाल्यानंतर ते देखील दंग झाले. पोलिसांनी महिलेच्या यौन शोषणाबाबतची तपासणी सुरू केली आहे. नर्सिंग होममधील या महिलेसोबत काही गैरकृत्य किंवा येथील एखाद्या कर्मचाऱ्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याबाबतची चौकशी करत आहे. 

 

सदरील महिलेच्या आई-वडिलांचा पाण्यात बुडून मृ्त्यू झाला होता. या धक्का ती सहन न करू शकल्यामुळे कोमात गेली होती. याप्रकरणात रूग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की, आमच्या येथे महिला कर्मचारीशिवाय कोणताही पुरुष कर्मचारी महिला रूग्णाच्या खोलीत प्रवेश करत नाही.