आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हेल्थ डेस्क - अमेरिकेतील सरकारी हेल्थ केअर सेंटरमध्ये एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथे गेल्या 14 वर्षांपासून कोमात असलेल्या महिलेवर उपचार सुरू आहेत. त्याच महिलेने नुकतेच एका बाळाला जन्म दिले आहे. जवळपास दीड दशकापासून कोमात असलेली महिला गर्भवती झालीच कशी असा प्रश्न सर्वांना पडला आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सविस्तर तपास केला जात आहे. रुगणालयातील स्टाफने या महिलेवर बलात्कार केला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.
पीडित महिला 14 वर्षांपूर्वी पाण्यात बुडण्यापासून वाचली होती. तिला बाहेर जिवंत काढण्यात आले तरीही डोक्यात पाणी भरल्याने ती कोमात गेली. तेव्हापासूनच सरकारी रुगणालयात तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिच्यावर 24 तास नजर ठेवावी लागते. दिवसातून कित्येकवेळा स्टाफ तिचे चेक-अप करण्यासाठी येत राहतात. याच दरम्यान तिचा लैंगिक छळ करण्यात आला असावा असे सांगितले जात आहे. या घटनेनंतर हेल्थ केअर सेंटरने आपल्या स्टाफ संदर्भातील नियमांमध्ये बदल केला आहे.
आता पुरुष स्टाफसोबत महिला कर्मचारी आवश्यक
अॅरिझोना येथील हॅसिएन्डा हेल्थ केअर सेंटरने जारी केलेल्या माहितीनुसार, महिलांचे चेकअप करताना पुरुष स्टाफसोबत आता महिला चिकीत्सकांना सोबत ठेवणे बंधनकारक झाले आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहता त्यांच्या सुरक्षिततेसाठी ही उपययोजना करण्यात आली आहे. सोबतच, कोमात असलेल्या महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीत स्टाफ पूर्णपणे सहकार्य करत आहे. अमेरिकेतील सरकारी रुगणालयांमध्ये यापूर्वीही महिला रुग्णांच्या लैंगिक शोषणाचे आरोप लागले आहेत. 2013 मध्ये अॅरिझोना प्रांतातील एका हेल्थ केअर सेंटरमध्ये अशा आरोपांवरून सरकारी फन्डिंग बंद करण्यात आली होती. येथील कमर्चारी रुग्णांचे लैंगिक शोषणच नव्हे, तर येणाऱ्या लोकांसोबत अतिशय असभ्य वर्तन करत असल्याच्या तक्रारी सुद्धा मिळाल्या होत्या.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.