आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र कपड्यांमध्ये अडखळतपणे चालत होती महिला, संशय आल्यामुळे पोर्ट अधिकाऱ्यांनी केली तिची तपासणी; स्कर्टमध्ये मिळाले असे काही की, सर्वच झाले हैराण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तैपेई : तैवानच्या किनमेन येथील पोर्टवर एका महिलेची तपासणी केली असता तिच्याकडे 24 गर्बिल्स (उंदराचा एक प्रकार) मिळाले. ती आपल्या स्कर्टमध्ये हे गर्बिल्स लपवून घेऊन जात होती. महिलेच्या अडखळत्या चालीवरून तटरक्षक बलाच्या अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला. यानंतर त्यांनी ही कारवाई केली. या महिलेने चीनवरून हे गर्बिल्स आणले होते आणि आपल्या एका मित्रासाठी घेऊन जात असल्याचे तिचे म्हणणे होते. 

 

स्कर्टमध्ये जिवंत सापडेल गर्बिल्स...

> कोस्ट गार्डच्या मते, गर्बिल्सची तस्करीच्या आरोपात वु (60) या महिलेला किनमेनच्या शुइतोउ पोर्टवरून अटक करण्यात आली आहे. तिचा विचित्र ड्रेस आणि अडखळत्या चालीमुळे अधिकाऱ्यांना तिच्यावर संशय आला होता. त्यानंतर तिची तपासणी करण्यात आली असता तिच्या स्कर्टमध्ये 24 जिवंत गर्बिल्स आढळले. आपल्या मित्राला गिफ्ट देण्यासाठी हे गर्बिल्स घेऊन जात असल्याचे तिने सांगितले. पण कोणत्या मित्रासाठी घेऊऩ जात आहे याबाबत तिला काही सांगता आले नाही. 


घाबरल्यामुळे महिलेवर आला संशय 

> कोस्ट गार्डने सांगितल की, दुपारच्या सुमारास वु चीनच्या फुजियान भागातून तैवानमध्ये पोहोचली. येथे पोहोचल्यानंतर ती खूप घाबरलेली होती आणि तिने विचित्र ड्रेस परिधान केल्याचे  अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. 

> महिलेने सांगितले की, तिने चीनच्या एका दुकानातून या गर्बिल्सची खरेदी केली. एका नर गर्बिलसाठी तिने 50 चीनी युआन (525 रूपये) दिले होते. तर एक मादा गर्बिलसाठी 150 चीनी युआन (1574 रूपये) दिले. यासाठी प्रत्येक गर्बिलची ट्रान्सपोर्टेशन फीसाठी  60 युआन (630 रूपये) खर्च केले होते. 

> चीनच्या मार्केटमद्ये या महागड्या किमतीमध्ये विक्री होत असते. येथे एका नर गर्बिलची किंमत तब्बल 1100 रूपये आमि एका मादा गर्बिलची किंमत 2200 रूपये आहे. दरम्यान स्मगलर्सने या महिलेला सुरक्षेविषयी माहिती मिळविण्यासाठी पाठवले असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...