आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सकाळी 9.30 वाजता नोकरीसाठी निघाली महिला, मेट्रो स्टेशनवर गेली-तिकीटही घेतले पण ट्रेनमध्ये बसली नाही; 10.40 वाजता घेतली ट्रेनसमोर उडी, ड्रायव्हरने ब्रेक लावला पण......

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नोएडा -  येथील सेक्टर 16 च्या मेट्रो स्टेशनवर एका महिलेने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिला दररोज प्रमाणे सकाली 9.30 वाजता ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली होती. पण ती ऑफिसला गेलीच नाही. तिने मेट्रो स्टेशनवर तिकीट घेतले, वर गेली आणि बराच वेळ तिथे बसली. नंतर 10.40 वाजता तिने अचानक एका ट्रेनसमोर उडी घेतली. महिलेने उडी घेताच ड्रायव्हरने ब्रेक लावला. महिलेला पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. 


जस्ट डायलमध्ये काम करत होती महिला. 

> घटनेनंतर मृत महिलेच्या बॅगमधून मिळालेल्या माहितीवरून तिचे नाव शितल श्रीवास्तव होते. ती जस्ट डायल कंपनीत चांगल्या पदावर नोकरीला होती. तिच्या कुटुंबीयांना घटनेची सूचना देण्यात आली.


मुलीच्या आईने सांगितले - नवऱ्यासोबत व्हायचे भांडण

> 29 वर्षीय शितल पती देवेश आणि 3 वर्षीय मुलीसोबत सेक्टर 22 च्या एफ ब्लॉक मध्ये राहत होती. 9 वर्षांपूर्वी तिचा विवाह झाला होता. शितलच्या आईने सांगितले की, पती-पत्नीमध्ये भांडण होत होते. पण शितल असे टोकाचे पाऊल उचलेले याबाबत विचारही केला नव्हता. तर दुसरीकडे पती देवेशने या गोष्टीला नकार दिला आहे. एसएचओ राजबीर सिंह चौहान यांनी सांगितले की, मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत कुटुंबीयांकडून कोणतीही तक्रार झाली नाही. तक्रार दाखल झाल्यानंतर आम्ही पुढील कारवाई करू.

बातम्या आणखी आहेत...