आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- लक्ष्मी नगर परिसरातल आपल्या दोन पोटच्या गोळ्यांना गच्चीवरून फेकून स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यामुळे महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर महिला रूग्णालयात भर्ती आहे. पोलिसांच्या तपासात समोर आले की, महिला नेहमी झोपेच्या गोळ्या खायची, शिवाय संशयामुळे पती-पत्नीत नेहमी वाद व्हायचे. जखमी महिलेला दोन्ही मुलांच्या मृत्यूची माहिती दिली नाहीये.
सोमवारी रात्री 9 वाजता ललिता पार्क स्थित एका बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून महिला आणि 2 मुले खाली पडल्याची माहिती मिळाली. रूग्णालयात नेत असताना रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. आलिया(34) चे 2010 मध्ये मुनव्वरसोबत लग्न झाले होते. त्यांना 7 वर्षांची मुलगी महेक आणि 3 वर्षांचा मुलगा अफरान होता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.