आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Jumps From Third Floor With Two Kids After Short Quarrel With Husband In Delhi

पतीसोबत वाद काय झाला, महिलेने आपल्या 3 वर्षांच्या मुलाला छतावरून फेकले, मग केले असे काही...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - येथील लक्ष्मी नगर परिसरात एका महिलेने आपल्या दोन मुला-मुलींना तिसऱ्या मजल्यावरून फेकले. यानंतर स्वतः देखील आत्महत्या करण्यासाठी उडी घेतली. यातील एका मुलाचे वय 3 वर्षे आणि दुसऱ्या मुलीचे वय 7 वर्षे होते. तिसऱ्या मजल्यावरून पडून त्या दोघांचाही जागीच मृत्यू झाला. लक्ष्मी नगर परिसरातील ललिता पार्क सोसायटीमध्ये 25 मार्च रोजी रात्री ही घटना घडली. शेजाऱ्यांनीच पडण्याचा आवाज ऐकून गर्दी केली. यानंतर पोलिसांना घटनास्थळी बोलावले.


महिला जिवंत, उपचारासाठी रुग्णालयात दाखल
लक्ष्मी नगर पोलिस स्टेशनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, 34 वर्षीय महिला आलिया आपल्या पती आणि दोन मुला-मुलींसह राहत होती. घटनास्थळी पोलिस पोहोचले तेव्हा 3 वर्षांचा मुलगा अफरान जमीनीवर पडला. तर त्याची बहीण आणि आई पहिल्या मजल्यावरील बालकनीत पडले. आलिया जिवंत असली तरीही ती गंभीर जखमी आहे. प्राथमिक तपासात समोर आले की आलिया आणि पती मुनव्वर यांच्यात जोरदार वाद झाला. भांडणानंतर पती घरातून बाहेर पडला आणि रागाच्या भरात पत्नी आलियाने टोकाचे पाउल उचलले. या प्रकरणी पती मुनव्वरची चौकशी केली जात असून सविस्तर तपास केला जाणार आहे.