आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील एका पोलिस स्टेशनमध्ये आई-वडील आपल्या विवाहित मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह घेऊन पोहोचले. आपल्या मुलीचे असले हाल तिच्या सासरच्या मंडळीने केला असा आरोप कुटुंबियांनी लावला. तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच पीडितेच्या कुटुंबियांची तक्रार घेऊन यासंदर्भात तपास सुरू केला आहे.
भावाने मांडली हकीगत...
पोलिस स्टेशनला महिलेचा मृतदेह घेऊन येणाऱ्यांमध्ये तिचा भाऊ मनु कुमार सुद्धा होता. त्यानेच आपल्या बहिणीने भोगलेल्या नरकयातना पोलिसांना सांगितल्या. पीडित तरुणीचा विवाह 2012 मध्ये नवल महतो नावाच्या एका तरुसोबत झाला होता. ऐफतनुसार, तिच्या सासरी भरपूर हुंडा देण्यात आला होता. तरीही सासरच्या लोकांनी हुंड्याच्या मागणीसाठी तिचा छळ सुरू केला. सुरुवातीला त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या. परंतु, दिवसेंदिवस त्यांच्या मागण्या वाढत गेल्या. 4 लाख आणि एका दुचाकीची मागणी त्यांनी काही दिवसांपासून लावून धरली होती. त्यासाठी पती आणि सासू-सासऱ्यांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला. मग, दोन दिवसांपूर्वी तिची हत्या केली. हत्येचे पुरावे मिटवण्यासाठी त्यांनी मृतदेहाला सुद्धा आग लावली. यानंतर मुलगी पळून गेली अशी खोटी माहिती तिच्या कुटुंबियांना दिली.
असा झाला हत्येचा खुलासा...
पीडितेच्या कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे, शनिवारी (17 नोव्हेंबर) संध्याकाळी 7 वाजता महिलेचा पती नवल महतोने आपल्या मेहुण्याला फोन करून तुझी बहीण घर सोडून गेली अशी खोटी माहिती दिली. यानंतर फोनवरूनच कुटुंबियांनी आपल्या मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काहीच पत्ता लागत नसल्याने त्यांनी मुलीचे गाव गाठले. कुटुंबियांनी पतीला जाब विचारला तेव्हा सासू पीडितेचे दागिने लपवताना दिसून आली. याच गोष्टीवरून कुटुंबियांचा संशय वाढला आणि त्यांनी घर आणि गावात मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच पीडितेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला. तशाच अवस्थेत कुटुंबीय आपल्या मुलीचा मृतदेह घेऊन पोलिस स्टेशनला पोहोचले. यानंतर पोलिसांनी पती नवल महतोसह त्याच्या आई-वडील, भाऊ-बहिण अशा एकूणच 7 जणांना अटक केली. पीडित महिलेला दोन मुले आहेत. त्या दोघांनाही मामांनी आपल्यासोबत नेले. यासंदर्भात सविस्तर तपास सुरू आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.