आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेने BF चा असा मर्डर केला की ऐकूण पोलिसही झाले हैराण, महिलेने मर्डसाठी केला पोटाचा वापर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेनिसिल्व्हेनिया - अमेरिकेच्या पेनिसिल्व्हेनियामध्ये एका महिलेने बॉयफ्रेंडची हत्या केली. पण तिने वापरलेली पद्धत पाहून सर्वच हैराण झाले. तिने पोलिसांना सांगितले की, तिच्या पोटाचा वापर करून तिने BF चा मर्डर केला होता. पोलिसही ते ऐकूण हैराण झाले. 44 वर्षांच्या विंडी थॉमसला BF किनो बटलरच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले. पोस्टस मॉर्टर्म रिपोर्टनुसार श्वास गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाला. 


लठ्ठ असलेल्या या आरोपी महिलेने सांगितले की, तिने बॉयफ्रेंडचा मर्डर करण्यासाठी तिच्या भल्यामोठ्या पोटाचा वापर केला. 133 किलो वजन असलेल्या या महिलेने तिचे पोट असाप्रकारे बॉयफ्रेंडच्या तोंडावर दाबले की श्वास गुदमरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. 


केला असा युक्तीवाद 
महिलेने कोर्टात स्वतःचा बचाव करताना म्हटले की, तिच्याकडून चुकून ही घटना घडली. दारु पित असताना ती अचानक बॉयफ्रेंडच्या अंगावर जाऊन बसली. त्यानंतर दारुच्या नशेत बेशुद्ध झाली आणि त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडचा गुदमरून मृत्यू झाला असे महिलेने कोर्टात सांगितले. पण कोर्टाने ते मान्य केले नाही. 


जन्मठेप होण्याची शक्यता 
मीडिया रिपेार्ट्सनुसार महिलेवर विचित्र पद्धतीने बॉयफ्रेंडची हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. तिला कोर्टाकडून जन्मठेप सुनावली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. कोर्टात तिला 18 ते 36 वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते. 


पहिल्यांदाज घडली अशी घटना 
पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, की त्याच्या करिअरमध्ये कधीही त्याने असा खटला पाहिलेला नाही. अनेक प्रकारच्या मर्डरच्या केस येतात पण हे प्रकरण विचित्र होते, असे तो म्हणाला. 

 

बातम्या आणखी आहेत...