आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कूटीवरील महिलेचा मृत्यू; दुसरी महिला जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदनझीरा - दुर्गादेवीचे दर्शन घेऊन यात्रोत्सवातून घराकडे परतणाऱ्या स्कूटीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एका महिलेचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास औरंगाबाद चौफुलीजवळील त्रिमूर्ती चाैकाजवळ घडली. मनीषा वैजिनाथ दळवी (२४, चंदनझिरा) असे मृताचे तर सीमा विनोद इंगोले (२७, चंदनझिरा) असे गंभीर जखमी महिलेचे नाव आहे. 

त्रिमूर्ती चौकात नेहमीच अपघात घडतात. या घटनांमुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या ठिकाणी काही ठिकाणी खड्डेही पडलेले आहेत. सकाळी घडलेल्या या अपघाताची माहिती मिळताच चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु या अपघातात मनीषा दळवी यांचा मृत्यू झाला तर सीमा इंगोले यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल अविनाश नरवडे हे करीत आहेत. पोलिस पसार झालेल्या वाहनाचा शोध घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...