आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी पत्नीला समजले ती प्रेग्नंट आहे, पण नंतरही दुःखाने सोडली नाही पाठ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओक्लाहोमा - ही कथा आहे अमेरिकेच्या एका कपलची. एका मुलीसह त्यांचे छोटेसे कुटुंब होते. त्यांनी कुटुंब वाढवण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारीमध्ये पत्नीला ती पुन्हा प्रेग्नंट असल्याचे जाणवले. ती टेस्ट करायला गेली तर टेस्ट निगेटिव्ह आली. योगायोग असा की याच दिवशी तिच्या पतीचा एका अपघातात मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी पतीच्या अंत्यसंस्कारानंतर तिने पुन्हा टेस्ट केली तर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दुःखानंतर तिच्या जीवनात आनंद परतत होता. पण 25 आठवड्यांनी पुन्हा दुःखाचा प्रसंग ओढावला. महिलेच्या पोटात असलेल्या एका बाळाचा मृत्यू झालेला होता. 


प्रेग्नेंसीची गुडन्यूज 
- ओक्लाहोमाची राहणारी कोर्टनी हिल हिने 2016 मध्ये पतीला गमावले त्यामुळे ती प्रचंड निराश जालेली होती. पण पतीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशी तिला प्रेग्नंसीची बातमी मिळाली आणि ती काहीशी आनंदी झाली. 
- एका महिन्याने कोर्टनीला काही वेदना होऊ लागल्या. तिला नेमके काय होत आहे हे तिला समजत नव्हते. तिला मिसकॅरेजची भिती वाटू लागली, पण ती कितीही वाटई बातमीसाठी तयार होती. 
- ती डॉरक्टरांकडे गेली तेव्हा तिला धक्काच बसला. तिच्या पोटात तीन तिळे होते. 
- कोर्टनी म्हणाली, हे ऐकूण मी प्रचंड आनंदी झाले. मला तीन मुलांमध्ये गमावलेले पती भेटू शकतील असे ती म्हणाली. 


दुःख पिच्छा सोडयला तयार नव्हते.. 
- कोर्टनीचा हा आनंद फार काळ टिकला नाही. 26 आठवड्यांच्या प्रेग्नंसीनंतर ती डॉक्टरांकडे गेली तर तिला वाईट बातमी समजली. एका बाळाचा पोटातच मृत्यू झाला होता. 
- कोर्टनीसाठी हे अनपेक्षित होते. मुलांच्या आठवणीने पतीचे दुःख विसरण्याचा ती प्रयत्न करत होती पण यामुळे तिला नेमकी तीच आठवण आली. 
- एक बाळ गमावल्यानंतरही कोर्टनीने इतर दोन मुलांना जन्म दिला आणि ते पूर्णपणे सुदृढ आहेत. कोर्टनी म्हणते की, लोक त्यांना जुळे म्हणतात पण माझ्यासाठी आजही ते तिळेच आहेत. 

बातम्या आणखी आहेत...