• Home
  • woman looks like a school girl ageing reverse, reveals her secret

वाढत्या वयासह दिवसेंदिवस / वाढत्या वयासह दिवसेंदिवस तरुण होत आहे ही महिला, वयाच्या चाळीशीत लोक म्हणतात Schoolgirl; हे आहे Secret

दिव्य मराठी वेब टीम

Nov 09,2018 12:04:00 AM IST

तायपेई - तैवानची फॅशन डिझायनर असलेली ही तरुणी शालेय विद्यार्थिनीच्या घोळक्यात उभी राहिल्यास कुणीच फरक सांगू शकणार नाही. तिला पाहणारा प्रत्येक जण स्कूलगर्ल किंवा अल्पवयीन मुलगी समजण्याची चूक करतो. तिच्याकडे पाहून कुणीच सांगू शकत नाही की प्रत्यक्षात तिचे वय 43 वर्षे आहे. या वयातही टीनेजर लुक मेनटेन करणाऱ्या या फॅशन डिझायनरचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. तिनेच आपल्या ब्युटीचे रहस्य उलगडले.


ल्यूर सू असे या फॅशन डिझायनरचे नाव असून ती स्ट्रिक्ट डायट आणि व्यायाम करते. आहारात आरोग्याला घातक असलेले काहीच ती घेत नाही. त्यामुळेच तिचे वय जणू थांबले आहे असा खुलासा तिने मुलाखतीमध्ये केला आहे. तिने सांगितल्याप्रमाणे, ती उन्हात खूप कमी बाहेर पडते. यासोबतच आपल्या ग्लोइंग त्वचेची काळजी घेण्यासाठी त्वचा जास्त वेळ ओली सुद्धा ठेवत नाही. आपली स्किन ताजी ठेवण्यासाठी ती व्हिटामिन-सी असलेल्या क्रीम वापरते.


शुद्ध शाकाहारासह रोज घेते ब्लॅक कॉफी
ल्यूरने सांगितल्याप्रमाणे, ती रोज सकाळी झोपेतून उठताच ब्लॅक कॉफी घेते. यामुळे त्वचा अॅक्टिव्ह राहण्यात मदत होते. यासह कॉफी आणि इतर कुठल्याही खाण्या-पिण्याच्या पदार्थांमध्ये ती कधीही साखर घेत नाही. जेवणाच्या बाबतीत ती शुद्ध शाकाहारी आहे. मांसाहारापासून दूर असलेली ल्यू जास्तीत-जास्त फायबरयुक्त हिरव्या पाले-भाज्या खात असते.


व्यायाम अत्यावश्यक
ल्यूर आपल्या यंगर लुकसाठी सर्वात मोठे श्रेय व्यायामाला देते. तिच्या मते, जास्तीत-जास्त व्यायाम आणि खूप पाणी पिणे ज्यादा से ज्यादा एक्सरसाइज और खूब पाणी पिणे हे यंग दिसण्यामागचे सर्वात मोठे रहस्य आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर फिटनेस टिप्स देणाऱ्या ल्युरचे इंस्टाग्रामवर 7 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

X
COMMENT