आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक प्राण्यांसोबत एकाच बेडवर रात्र घालवते ही तरुणी, घरात प्रवेश करण्यासही घाबरतात लोक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - प्राण्यांविषयी माणसाचे असलेले प्रेम काही नवीन नाही. दिवसेंदिवस घरात पाळीव प्राणी ठेवण्याचे प्रमाण वाढत आहे. देश असे की विदेश अनेक लोक आपल्या घरात श्वान, मांजर किंवा इतर काही पाळीन प्राणी ठेवतात. परंतु, एका तरुणीच्या प्राण्यांवरील प्रेमाने तिच्या कुटुंबियांसह शेजाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले आहे. ती आपल्या घरात हिंस्र प्राण्यांसोबत राहते. एवढेच नव्हे, तर झोपताना सुद्धा त्यांना आपल्या बेडवर घेऊन झोपते. तिच्या या विचित्र सवयीमुळे लोक तिच्या घरात येण्यासही घाबरतात.


16 फुटांच्या अजगरासह इतके घातक कलेक्शन
- लंडनमध्ये राहणारी 21 वर्षांची तरुणी झी हिने 6 वर्षांची असताना पहिल्यांदा साप पाहिला होता. तेव्हापासूनच तिला सापांविषयी विशेष आकर्षण तयार झाले. 14 वर्षांची झाली तेव्हा तिने आपल्या आई आणि भावाला भांडून घरात साप आणला होता. सुरुवातीला साप बॉक्समध्ये ठेवावा लागला. परंतु, कुटुंबियांचा विरोध झाल्याने तिने सापांसाठी घर सोडले. 
- सध्या जनावरांच्या नर्सची प्रॅक्टिस करणारी झी एकटीच आपल्या घरात राहते. या घरात तिच्याकडे 16 सापांचे कलेक्शन आहे. यात प्रामुख्याने अजगरांचा समावेश आहे. त्यातील सर्वात मोठा अजगर बर्माचा पायथन आहे. 16 फूट लांब असलेल्या अजगराला उचलण्यासाठी किमान 2 लोक लागतील. 


रोजच करतात हल्ला, पण...
सापावर ती इतके प्रेम करते की काहीही करताना ती त्यांना एकटे सोडत नाही. अगदी झोपतानाही ती अजगरांना आपल्या बेडवर घेऊन झोपते. परंतु, झीच्या या विचित्र सवयींमुळे तिच्या शेजाऱ्यांची झोप उडाली आहे. लोक तिच्या घरी येण्यासही घाबतात. साप तिच्यावर रोजच हल्ला करतात. झी सांगते, की साप कधीही माणसांवर मुद्दाम हल्ला करत नाहीत. ते नेहमीच प्रत्येक गोष्ट कुतुहलाने पाहत असतात. त्यांना संकट वाटल्याशिवाय ते आक्रमक होत नाहीत. एवढेच नव्हे, तर अजगराने कुंडली मारल्यास त्यावर अल्कोहोलचा मारा करून सुटता येते. चावण्याचा प्रयत्न करत असेल तरी हीच ट्रिक वापरता येईल. यानंतर सोडत नसतील तर सापांचे डोके पाण्यात बुडवावे. अशा बऱ्याच ट्रिक आहेत ज्या वापरून सापांसोबत सुरक्षितपणे राहता येते असा दावा तिने केला.

बातम्या आणखी आहेत...