आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या ऐनवेळी बॉयफ्रेंडने दिला धोका, निराश महिलेने फंक्शन न टाळता जगाला केले हैराण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रेम्स. बॉयफ्रेंडने धोका दिल्यानंतर फ्रान्समध्ये राहणा-या एका महिनेने असे पाऊल उचलले ज्यामुळे प्रत्येकजण हैराण आहे. महिलेच्या बॉयफ्रेंडने लग्नाच्या तारखेपुर्वीच लग्न मोडले. यानंतर निराश महिलेने फंक्शन कँसल न करता, या इव्हेंटमध्ये स्वतःशीच लग्न केले. या फंक्शनमध्ये तिचे जवळचे लोक सहभागी झाले आणि तिने यासाठी जवळपास 20 लाख रुपये खर्च केले. यामध्ये 3 लाख तिने फक्त वेडिंग गाउनवर खर्च केले.


तीन महिन्यांपुर्वी मोडले होते लग्न 
- प्रान्सच्या रेम्स शहरात राहणारी 38 वर्षांची फायनेंस मॅनेजर लतितिया गुयेन यावर्षी मेमध्ये आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार होती. हे कपल गेल्या तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.
- या कपलने ग्रीसच्या सेंटोरिनी आयलँडवर लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तयारी सुरु केली होती. परंतू लग्नाच्या अवघ्या तीन महिन्यांपुर्वीच बॉयफ्रेंडने लग्न करण्यास नकार दिला.
- लतितियाने सांगितले की, आम्ही दोघं एकमेकांसोबत लग्न करण्याविषयी खुप आनंदी होतो. लग्नानंतर आम्हाला एक मुलं हवे होते आणि आम्ही अनेक प्लानिंग केल्या होत्या.
- 'सर्वकाही ठिक सुरु होते, परंतू यावर्षी फेब्रुवारीमध्ये अचानक आम्ही वेगळे झालो आणि हे कसे झाले हे मलाही कळाले नाही. मी आताही खुप दुःखी आहे आणि नेहमीच राहिल. परंतू आयुष्य एक भेट आहे आणि आपण हे एन्जॉय करायला हवे.'
- लतितियाने आपल्या सिंगल पर्सन मॅरेजवर जवळपास 20 लाख रुपये खर्च केले. हे लग्न लेंटोरिनी आयलँडवर झालेले पहिले सिंगल मॅरेज आहे. आपल्या लग्नाविषयी ती म्हणाली की, 'तुम्ही आयुष्यातून एक दिवस कमी करु शकत नाही. यामुळे मी या दिवशी काहीतरी पॉझिटिव्ह करण्याचा विचार केला. हे एक खुप साधारण लग्न होते. परंतू नवरदेव नसल्यामुळे हे लग्न विशेष बनले.'
- या अनोख्या लग्नात फक्त 8 पाहूणे सहभागी झाले. यामध्ये माझे पालक, बहीण, तिचा बॉयफ्रेंड आणि काही जवळचे मित्र सहभागी झाले. लग्नानंतर लतितिया काही आठवडे त्याच सँटोरिनी आयलँडमध्ये राहिली.

 

आता प्रेम करायची इच्छा नाही 
- बॉयफ्रेंडकडून मिळालेल्या धोक्यानंतर लतितियाला दूस-या कोणत्याही रिलेशनशीपमध्ये पडायची इच्छा नाही. ती म्हणते की, प्रेमावर विश्वास ठेवणे तिच्यासाठी आता कठीण आहे. आता ती स्वतःवर फोकस करेल. गरज पडल्यावर आई होण्यासाठी तिने आपले स्त्री बीज(एग्ज) फ्रोजन केले आहेत.
- लतितियाने सांगितले की, 'मी स्वतःशी लग्न केले, कारण मला त्या दिवशी काही तरी पॉझिटिव्ह करायचे होते आणि माझ्या आयुष्यात झालेला ड्रामा मला विसरायचा होता. माझ्या या निर्णयाने मला माझ्यावर अभिमान बाळगण्याची संधी दिली.'
- 'तुम्हाला कुणी सोडले हे नेहमी अपमानजनक असते, जर लग्नापुर्वीच असे झाले तर अजुनच वाईट असते. या सेरेमनीने मला माझा आत्मसन्मान परत केला आणि मी स्वतःशी पुन्हा जोडली गेले. हा माझा पुनर्जन्म होता.'
- 'एखादा पुरुष माझ्यासोबत लग्न करण्यास तयार नव्हता, परंतू मला स्वतःशी लग्न करायचे होते. कारण मला माहिती आहे की, मी शानदार आहे. मला याविषयी आता लाजिरवाणे वाटत नाही.'

 

बातम्या आणखी आहेत...