महाडमध्ये महिलेची दगडाने / महाडमध्ये महिलेची दगडाने ठेचून निर्घुण हत्या

divya marathi team

May 28,2011 06:59:06 PM IST

महाड - शहरापासून एक किलो मीटर अंतरावर असलेल्या शिरगाव गावाच्या हद्दीतील शेतामध्ये अनोळखी महिलेची हत्या करण्यात आली असल्याची नोंद महाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. महिलेची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी कोणताही पुरावा न ठेवता फरार झाले असून पोलीस तपास करीत आहेत.शिरगावच्या हद्दींत असलेल्या एका शिवारामध्ये महिलेला दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. महिलेच्या डोक्यांत दगड मारून तिला ठार मारण्यात आले.X
COMMENT