Home | Maharashtra | Vidarva | Akola | woman murder in akola

अकोला: 'त्या' महिलेचा केला गळा आवळून खून

प्रतिनिधी | Update - Sep 02, 2018, 12:41 PM IST

शुक्रवारी बंद घरात ३० वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला होता. या महिलेला आधी मारहाण केली,

 • woman murder in akola

  अकोला - शुक्रवारी बंद घरात ३० वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळला होता. या महिलेला आधी मारहाण केली, नंतर तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध शनिवारी खुनाचा गुन्हा दाखल केला. संशयावरून महिलेचा तिचा पतीला अकोल्यातून तर एका २२ वर्षीय युवकाला जळगाव येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  कल्याणी बारीला या महिलेचा मृतदेह वाशीम बायपास येथील रमाबाई आंबेडकर नगरातील एका बंद घरात शुक्रवारी आढळला होता. तीन- ते चार दिवसांपूर्वी या महिलेचा खून झाल्याने परिसरात दुर्गंधी सुटली होती. घातपाताच्या संशयावरून पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली होती. मृत महिलेच्या शवविच्छेदनानंतर शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या न्यायवैद्यक विभागाकडून प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात गळा आवळून मृत्यू व डोक्याला गंभीर इजा असल्याचे नमूद केले. पोलिसांचा संशय महिलेच्या पतीवर असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. महिलेशी ज्याचे संबंध होते त्याला पोलिसांनी शनिवारी जळगाव येथे ताब्यात घेतले. ही कारवाई निरीक्षक अन्वर एम. शेख यांच्या मार्गदर्शनात पीएसआय दिलीप पोटभरे, डीबीस्कॉडचे महेंद्र बहाद्दुरकर यांनी केली.

  महिला ही मुळची भिलवा येथील : पोलिस सूत्रानुसार, ही महिला मुळची मध्य प्रदेशातील भिलवा येथील आहे. ही महिला काही वर्षापूर्वी येथे काही महिलांच्या संपर्कात आली होती. त्यानंतर तिने येथीलच युवकाशी विवाह केला. त्यापासून तिला मुलगा, मुलगी आहे. महिलेचे जळगाव येथे येणे जाणे सुरु झाल्यानंतर तिचा पती आणि तिच्यात वाद सुरु झाले होते.

  २८ ऑगस्ट रोजीच केला खून : महिलेचा खून २८ ऑगस्टला ोला. नंतर नैसर्गिक पद्धतीने किंवा स्वत: आत्महत्या केली असे पोलिसांना वाटावे, म्हणून मृतदेहाची आरोपींनी विल्हेवाट लावली नाही, असे पोलिस तपासात समोर येत आहे.

  मृतदेहाजवळ आक्षेपार्ह वस्तू
  महिलेच्या मृतदेहाजवळ पोलिसांना काही आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. त्यावरून महिलेच्या मृत्यूला अनैतिक संबंधाची किनार असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला असता पाच-सहा महिन्यांपासून ज्याच्यासोबत महिलेचे संबंध वाढले होते. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Trending