आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यरात्री आला व्हॉट्सअॅप ग्रुपवर मेसेज, 'मी आईचा मर्डर केलाय...', सकाळी घरात होते भीतिदायक दृश्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांसवाडा (राजस्थान) : एका महिलेचा राहत्या घरातच क्रूरपणे खून करण्यात आला. या घटनेचा मॅसेज मुलाने मोबाइलवरून रात्री 12:30 वाजता व्हाट्सअप ग्रुपवर टाकला होता. या मॅसेजमध्ये मुलाने आईचा खून केल्याची आणि नंतर स्वतः माही बॅकवॉटरच्या गॅमन पुलावर आत्महत्या करणार असल्याची माहिती लिहिली होती. ग्रुप सदस्यांनी या मॅसेजकडे गांभीर्याने पाहिले नाही. परंतु सकाळी शेजारी आणि ग्रुप सदस्य घरी पोहोचल्यानंतर ही घटना सत्य असल्याचे समोर आले.


पोलिसांनाही कळेना नेमकं काय आहे प्रकरण... 
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गॅमन पुलाच्या बॅकवॉटरमध्ये मुलाचे शव शोधणे सुरु केले. 40 वर्षीय देवकन्या यांचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला होता परंतु ज्या 20 वर्षीय मुलगा विनयवर खुनाचा संशय होता त्याचेही शव सापडले नाही. यामुळेही अशीही शक्यता वर्तवली जात आहे की, कुणीतरी सुनियोजितपणे खून करून मुलाच्या मोबाइलवरून मॅसेज पाठवून मुलालाच गुन्हेगार दाखवणायचा प्रयत्न केला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्टपणे समोर आलेले नाही. घरातील वरच्या खोलीतील आलमारी उघडी होती आणि सामनाही अस्तव्यस्त पडलेले होते. यामुळे पोलीस चोरीच्या अँगलनेही तपस करत आहेत.


12:30 वाजता आलेल्या मॅसेजने सर्वांना केले चकित 
'पंचाल समाज चौदाह चौखरा' नावाने असलेल्या पंचाल समाजाच्या एका व्हाट्सअप ग्रुपवर रात्री 12:30 वाजता आलेल्या मॅसेजने सर्व ग्रुप सदस्यांना चकित केले. मॅसेज विनयच्या मोबाइलवरून आला होता. यामध्ये लिहिले होते की, 'मला माफ करा...अलविदा, मम्मीने जास्त केले, मी मारून टाकले.' एका पोस्टनंतर विनयने पुन्हा एक पोस्ट करून लिहिले की, गमन गॅमन पुलाच्या बॅकवॉटरमधून माझा मृतदेह काढावा...' रात्री उशिरा आलेला मॅसेज आणि अनंत चतुर्दशीच्या थकव्यामुळे केवळ 2 सदस्यांनी मॅसेजला रिप्लाय दिला. विनयच्या मोठ्या काकांनी पुतण्यावर खुनाचा संशय घेत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.


डोक्याच्या मागील बाजूने हल्ला, जबडाही कापून टाकला...
देवकन्या घरातच बांगड्याचे दुकान चालवत होती. सकाळी मंदिरात जाण्यासाठी आणि दुकान उघडण्यासाठी लवकर उठत होती. परंतु सोमवारी सकाळी घराचा दरवाजा उघडला नाही. शेजाऱ्यांनी आवाज दिला परंतु घरातून कोणतेच उत्तर मिळाले नाही. त्यानंतर समाज ग्रुपवर आलेला मॅसेज चर्चेत आला. संशय वाढल्यामुळे देवकन्याचा समाजातील लोकांना बोलावण्यात आले. देवकन्याचे मोठे दीर राजेंद पंचाल, समाज अध्यक्ष हरीश पंचाल आणि काही लोक आले आणि घरात पाहिले तर देवकन्या देवघरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती. तिजोरी आणि भीतीवर उडालेल्या रक्तावरून क्रूरपणे खून करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते. जबडाही तोडण्यात आला होता.


5 दिवसांपूर्वी आला होता घरी 
वडील कांतीलालसोबत विनय मध्यप्रदेशमध्ये जबलपूर येथे एका कंपनीत काम करतो. 5 दिवसांपूर्वी तो घरी आला होता. मोठा भाऊ कुलेश कुवेतमध्ये वर्कर आहे. रात्री 8 वाजेपर्यंत विनयला गणेश उत्सवात पाहण्यात आले होते. ज्या रूममध्ये देवकन्याचे शव पडलेले होते तेथे पूजन सामग्रीही पडलेली होती. विनयने ही पूजन सामग्री बाजारातून आणल्याचे सांगितले जात आहे. घटनास्थळी केसांचे गोळेही पडलेले होते. यावरून या दोघांमध्ये धरपकड झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घरातील वरच्या रूममध्ये आलमारी उघडी होती आणि सामनाही अस्ताव्यस्त पडलेले होते.


गॅमन पुलावर लोकेशन, माही बॅकवॉटरमध्ये शोधकार्य परंतु सापडले नाही विनयचे शव
अंबापूरा पोलिसांनी माही बॅकवॉटरमध्ये विनयच्या डेडबॉडीचे शोधकार्य सुरु केले आहे. तहसीलदार चांदमल सोनी आणि गावकऱ्यांच्या मदतीने संपूर्ण परिसरात शोध घेतला परंतु डेडबॉडी सापडली नाही. विनयचे लास्ट लोकेशन गॅमन पुलाजवळच ट्रेस झाले आहे. त्याच्या आईने रात्री 8:30 वाजता त्याला घरी कॉल करून बोलावले होते.

बातम्या आणखी आहेत...