आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

35 वर्षीय महिलेची विवस्त्र धिंड, ती हात जोडत होती, रडत-ओरडत होती, पण भीतीमुळे 500 जण फक्त तमाशा पाहत होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरा (बिहार) - भोजपूर जिल्ह्यातील बिहिया शहरातील बदनाम एरियात सोमवारी एका तरुणाच्या संशयास्पद मृत्यूनंतर जमाव हिंसक बनला. संतप्त जमावाने बदनाम एरियावर हल्ला चढवला. 3 घरांना आग लावली. 4 वाहने जाळली. एका घरलाही ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. बदनाम एरियाच्या एका महिलेला नग्न करून अख्ख्या शहरात रात्री उशिरापर्यंत फिरवले. नंतर खूप प्रयत्न करून पोलिसांनी त्या महिलेला सोडवले आणि आपल्या कस्टडीत घेऊन तिला वस्त्रे दिली. हिंसक जमावाचे रौद्र रूप पाहून पोलिसांनाही जीव वाचवून पळ काढावा लागला. संध्याकाळी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी 6 राउंड हवेत गोळीबार केला. जाळपोळ आणि तोडफोडीदरम्यान जमावाने बिहिया स्टेशनवरून जात असलेल्या जनसाधारण एक्सप्रेससहित 3 रेल्वेंवर दगडफेक केली. यात 6 प्रवासी गंभीर जखमी झाले.

 

रेल्वे लाइनच्या किनारी आढळला होता मृतदेह
- संध्याकाळी उशिरा आग विझविण्यासाठी पोहोचलेल्या फायर ब्रिगेडच्या गाड्यांनाही समाजकंटकांनी दगडफेक करून तोडफोड केली. पूर्ण घटनाक्रमदरम्यान पोलिस असहाय बनलेले होते आणि हिंसेवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेले दिसले.

- मृत तरुणाचे नाव विमलेश कुमार साह होते. तो आरा कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतल्यानंतर बिहिया येथे आला होता. यादरम्यान त्याच्यासोबत काही संशयास्पद घटना घडली आणि तिचा मृतदेह बदनाम एरियाच्या रेल्वेलाइनवर आढळला.

- सूत्रांनुसार, रेल्वे ट्रॅकच्या कडेला दुपारी त्याचा मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिस आणि स्थानिक पोलिसांनी तेथे धाव घेतली. परंतु, हद्दीच्या वादामुळे पोलिसांच्या कारवाईला विलंब झाला. यामुळे जमाव संतप्त झाला आणि पाहता-पाहताच हिंसा पसरली.

- घटनेच्या 4 तासांनंतरही पोलिसांतील एकही वरिष्ठ अधिकारी तेथे पोहोचला नव्हता. संध्याकाळी 7 वाजता मोठ्या संख्येने पोलिस बल आणि वज्रवाहन तसेच फायर बिग्रेड घटनास्थळी पोहोचले. आंदोलकांना त्यांनी पिटाळून लावले. यानंतर मृतदेह ताब्यात घेतला.


500 जण तमाशा पाहत होते, हिंसक जमाव मनमानी करत राहिला
- बिहियामध्ये सोमवारी जे झाले, तसे यापूर्वी कधीही झाले नव्हते. माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य जमावाने केले. या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. हिंसक जमावाने पोलिसांच्या समोरच बदनाम एरियातील एका 35 वर्षीय महिलेला घराबाहेर खेचले... तिला नग्न करून बेदम मारहाण करत जवळजवळ अर्धा किमीपर्यँत शहरातील अनेक रस्त्यांवर फिरवले. ती महिला जीव वाचवण्यासाठी लोकांना विनवणी करत होती, हात जोडत होती, रडत-ओरउत होती, परंतु जमावाचे रौद्ररूप पाहून एकानेही तिला वाचवण्याची हिंमत दाखवली नाही.
- पाठीमागे 500 हून जास्त जणांची गर्दी फक्त तमाशा पाहत होती. यानंतर जगदीशपुर पोलिस स्टेशनचे इंचार्ज अरविन्द कुमार आणि काही स्थानीय तरुण पुढे झाले आणि महिलेला आपल्या सुरक्षेत घेऊन वाचवले.
- या गोंधळानंतर एसपींनी मोठी कारवाई केली आहे. बिहिया पोलिस स्टेशनचे कुवर गुप्ता यांच्यासह 8 जणांना सस्पेंड करण्यात आले. बिहियामध्ये एसपी अवकाश कुमार काम पाहत आहेत. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या लाजिरवाण्या घटनेचे आणखी Photos...   

 

बातम्या आणखी आहेत...