आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोटिक बाहुल्यांचे वेश्यालय उघडतेय ही महिला, सर्वांच्या पतींना केले निमंत्रित; दिली अशी कारणे...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क - गरजवंतांसाठी अनोळखी लोकांकडून ऑनलाइन निधी गोळा करण्यासाठी क्राउडफंडिंग एक प्रभावी माध्यम आहे. या ठिकाणी लोक आप-आपल्या किंवा लोकांच्या समस्या मांडून त्यांच्यासाठी निधी गोळा करतात. यात बहुतांश लोक आपल्या गंभीर आजारासाठी, रस्त्यावर सापडलेल्या अनाथ मुलांसाठी किंवा एखाद्या मोहिमेसाठी मदत मागत असतात. परंतु, अमेरिकेतील एका महिलेने चक्क सेक्स डॉलचे वेश्यालय उघडण्यासाठी एक कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा करण्याची विनंती केली आहे. आपले हे वेश्यालय समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक मोहिम ठरेल असा दावा ती करते. एवढेच नव्हे, तर ती विवाहित महिलांना आवाहन करते की त्यांनी देखील आप-आपल्या पतींना या वेश्यालयात आवश्य पाठवावे.


मी वेश्यालयातून करणार समाज सुधारणा...
- युनिकोल युनिकॉर्न असे या महिलेचे नाव असून तिने 1.20 लाख ब्रिटिश पाउंडचा निधी गोळा करण्यासाठी क्राउडफंडिंग वेबसाइटवर रिक्सेस्ट केली. तेव्हापासूनच लोक तिच्यावर संताप व्यक्त करत आहेत. काही असेही आहेत की ज्यांनी तिच्या या मोहिमेचे समर्थन केले. ब्रिटिश आणि अमेरिकेतील विविध माध्यमांनी तिची मुलाखत घेऊन सविस्तर माहिती जाहीर केली. युनिकोल म्हणते, की ती अशा प्रकारचे वेश्यालय सुरू करून समाजाची सेवा करणार आहे. 
- जगभरात महिलाविरोधी अत्याचार वाढत असताना पुरुषांना महिलांची परवानगी घेण्यास शिकवणे अत्यंत महत्वाचे झाले आहे. या वेश्यालयात आपण येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हीच गोष्ट शिकवणार आहोत. येथील सेक्स डॉल ह्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स तंत्रज्ञानाने सज्ज अशा रोबोटिक डॉल असतील. त्यांच्याकडूनच पुरुषांना महिलांशी कसे वागावे ह्या गोष्टी आपण शिकवणार आहोत असे ती म्हणते. 
- सद्यस्थितीला रोबोटिक सेक्स डॉल बाजारात उपलब्ध असल्या तरीही त्या कन्सेंट देऊ शकतील एवढ्या आधुनिक नाहीत. त्यामुळे, युनिकोलचे दावे खोटे आणि फक्त आपला हेतू साध्य करण्यासाठी आहेत अशी टीका तिच्यावर होत आहे. त्यावर बोलताना, आज अशा डॉल नसतील तरीही भविष्यात अशा डॉल बाजारात आवश्य असतील. त्यांच्याबद्दल आपण बोलत आहोत. येत्या काही दिवसांत रोबोटिक बाहुल्यांचे वेश्यालय सुरू होत आहेत. त्यातून होणाऱ्या कमाईतून दिवसेंदिवस टेक्नोलॉजी विकसित करत राहीन असे तिने सांगितले.

 

कोण आहे ही महिला?
युनिकोल ही एक मॉडेल आणि व्हाइस आर्टिस्ट आहे. दोन वर्षांपूर्वीच तिने आपला एक पॉर्न व्हिडिओ डीव्हीडी रिलीज केला होता. ऑनलाईन आणि ऑफलाइन त्याची प्रति डीव्हीडी 200 पाउंड अर्थात जवळपास 20 हजार रुपयांत तिने विक्री केली. सोशल मीडिया इंस्टाग्रामवर न्यूड आणि सेमी न्यूड फोटो पोस्ट करणाऱ्या युनिकोलचे 14 हजार फॅन्स आहेत. काही लोकांनी तिची मोहिम ऐकूण तिला दिवाळखोर असेही म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...