Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | woman period problem diet information

आहाराचे पथ्य पाळा, 'त्या' दिवसातील वेदना दूर करा

दिव्य मराठी वेब,chrysanthemum.jpg | Update - Jun 08, 2019, 12:10 AM IST

पोषक तत्त्व आणि व्हिटॅमिन K मिळतं. हे रक्तस्राव आणि ब्लड क्लॉटिंगला नियंत्रित करतं.

 • woman period problem diet information

  मासिक धर्म वेदनांपासून मुक्तीसाठी आहारात सामील करा हे पदार्थ. दर महिन्यात चार दिवस महिलांना फार जड जातात. पीरियड्स येण्यापूर्वी आणि त्या दरम्यान अनेक त्रासाला सामोरे जावे लागते. अशात महिलांनी त्या कशा प्रकाराचा आहार घेत आहे याकडे लक्ष द्यावं कारण याचा परिणाम आरोग्यावर होतो. जाणून घ्या यावेळी काय खावे आणि काय नाही.


  - पोषक तत्त्व आणि व्हिटॅमिन K मिळतं. हे रक्तस्राव आणि ब्लड क्लॉटिंगला नियंत्रित करतं.
  - अख्खं धान्य वाळवलं किंवा प्रोसेस केलं जात नाही त्यामुळे यातील पोषक तत्त्व टिकून राहतात. हे कार्बोहायड्रेट्स आहेत जे सेराटोनिन रिलीज करतात. सेराटोनिन हार्मोनमुळे या दिवसात आराम जाणवतो.


  - पीरियड्स दरम्यान भूक कमी होऊन जाते आणि शरीरात आयर्नची पातळी कमी होऊ लागते म्हणून या दरम्यान दुपारच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या सामील कराव्या.
  - पीरियड्स दरम्यान सॅलमन आणि टूना सारखे मासे खाल्ल्याने वेदनांपासून मुक्ती मिळते. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं.


  - पीरियड्समध्ये गोड खाण्याची इच्छा होते. अशात केक, किंवा मिठाई सारखे इतर काही गोड पदार्थ खाण्यापेक्षा गोड फळं खाणे योग्य ठरेल.
  - या दरम्यान ताण, चिडचिड यापासून मुक्तीसाठी मिंट किंवा आळं-मधाचा चहा पिणे योग्य ठरतं. याने मानसिक शांती मिळते.

Trending