Home | National | Madhya Pradesh | Woman played death game in ujjain, madhya pradesh

ज्यांनी मुलाला तुरुंगात पाठवले, त्यांच्याच घरात जाऊन आईने स्वतःला घेतले पेटवून

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 12, 2018, 02:50 PM IST

दशहरा मैदान क्षेत्रात राहणा-या पेट्रोल पंप संचालक प्रेम छाबडा यांच्या घरी जाऊन रोजी जुनेजा नावाच्या महिलेने स्वतःवर पेट्

 • Woman played death game in ujjain, madhya pradesh

  उज्जैन,मप्र | दशहरा मैदान क्षेत्रात राहणा-या पेट्रोल पंप संचालक प्रेम छाबडा यांच्या घरी जाऊन रोजी जुनेजा नावाच्या महिलेने स्वतःवर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. महिला 80 टक्के जळाली आहे. डॉक्टरांनी तिला इंदौरमध्ये हलवले आहे. तिची परिस्थिती गंभीर आहे. छाबडा कुटूंबियांनी सहा वर्षांपुर्वी या महिलेच्या मुलावर केस केली होती. या मुलाने फेसबुकवर कुटूंबातील सदस्याचा फेक आयडी बनवून त्याला ब्लॅकमेल केल्याचे आरोप लावण्यात आले होते. गेल्या महिन्यातच समाजाने सांगितल्यानुसार दोन्ही कुटूंबात समझोता झाला होता. महिलेच्या कुटूंबाने फ्रीगंज गुरुव्दारात माफीनामा लिहून दिला होता. यामुळे महिलेला अपमानित झाल्यासारखे वाटत होते.

  - व्यावसायिक इंद्रकुमार जुनेजा यांची 52 वर्षीय पत्नी रोजी मंगळवारी सकाळी फव्वार चौक येथील तिच्या घरातून अॅक्टिव्हा घेऊन एकटी बाहेर पडली. ती प्रेम छाबडाच्या घरी पोहोचली. प्रेम छाबडाची पत्नी सीमासोबत बोलत ती सोफ्यावर बसली. दोघींमध्ये 43 सेकंद वाद झाला. यानंतर सीमा उठून पाणी आणण्यासाठी गेली. रोजी सोफ्यावर उभी राहिली. नंतर तिच्या जवळची पेट्रोलची बॉटल काढून कपड्यांवर ओतून घेतली आणि स्वतःला पेटवून घेतले.
  - तिचा आवाज ऐकूण पंप मालकचा ड्रायव्हर आणि पत्नी खोलीमध्ये पोहोचले. दोघांनी रोजीला वाचवण्यासाठी आग विझवली. पोलिसांना सुचना दिल्या. पोलिसांनी रोजीला जिल्हा हॉस्पिटलमध्ये भरती केले. येथून इंदौरला हलवले. इंदौरच्या टी चोइथराम हॉस्पिटलमध्ये रोजीवर उपचार सुरु आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, परिस्थिती गंभीर आहे. तिला लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले आहे.

  समझोता झाल्यानंतर म्हणाली होती- याचा सूड घेणार
  रोजी जुनेजाचा मुलगा वरुण विरुध्द छाबडा कुटूंबाने 2012 मध्ये पोलिसांकडे तक्रार केली होती. यामध्ये सांगण्यात आले होते की, फेसबुकवर फेक आयडी बनवून त्याने काही फोटो अपलोड केले होते. हे डिलीट करण्यासाठी 25 लाख रुपये मागितले होते. पैसे न दिल्याने बदनामी करण्याची आणि जिवे मारण्याची धमकी दिली होती. सायबर सेलमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आली होती. यामुळे भोपाळमध्ये वरुणवर 419, 384, 509 कलमांअंतर्गत केस दाखल करण्यात आली होती. 23 ऑगस्ट 2017 ला कोर्टाने वरुणला दोषी मानत शिक्षा सुनावली होती. दोन्ही पक्षातील लोक हे अरोडंवंशीय समाजातील असल्यामुळे समझोता व्हावा असे असे सुचवण्यात आले. समाजातील लोकांच्या उपस्थितीत 14 ऑगस्ट 2018 रोजी जुनेजा कुटूंबाने लिखित माफीनामा दिला. तेव्हा रोजी म्हणाली होती की, मी सूड घेईल.

  दोन्ही कुटूंबियांमध्ये जुना वाद आहे
  दोन्ही कुटूंबियांमध्ये जुना वाद आहे. समझोता झाल्यानंतर रोजीला स्वतः अपमानित असल्यासारखे वाटत होते. तिने छाबडा कुटूंबाचा सूड घेण्यासाठी हे पाऊल उचलले. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत.

  - सचिन अतुलकर, एसपी

Trending