Home | International | Other Country | Woman receives death threats after people spot embarrassing detail in her photo

महिला ब्‍लॉगरने पोस्‍ट केला आपल्‍या परफेक्‍ट मॉर्निंगचा फोटो, चुका पाहून भडकले सोशल मीडिया यूझर्स

दिव्‍य मराठी वेब टीम | Update - Sep 05, 2018, 12:00 AM IST

- आयर्लंडच्‍या एका महिला ब्‍लॉगरला सोशल मीडियावर शेअर केलेल्‍या एका फोटोवरून शिव्‍या मिळत आहे.

 • Woman receives death threats after people spot embarrassing detail in her photo

  डबलिन - आयर्लंडच्‍या एका महिला ब्‍लॉगरला सोशल मीडियावर शेअर केलेल्‍या एका फोटोवरून शिव्‍या मिळत आहे. महिलेने स्‍वत:चा परफेक्‍ट मॉर्निंगचा एक फोटो सोशल मीडियावर पोस्‍ट केला. याच्‍या कॅप्‍शनमध्‍ये महिलेने पॅनकेक, स्‍ट्रॉबेरी आणि चहासोबत दिवसाची सुरूवात करत असल्‍याचे लिहिले आहे. मात्र फोटोतील एका टेबलावर ठेवलेल्‍या माऊथवॉशवर सोशल मीडिया यूझर्सची नजर पडली आणि त्‍यांनी हा प्रमोशनल फोटो असल्‍याचे सांगत महिलेला शिव्‍यांची लाखोली वाहिली. अशा पद्धतीने खोटा फोटो पोस्‍ट केल्‍याबद्दल महिलेला शिव्‍या पडत आहेत. इतकेच नव्‍हे तर महिलेला जीवे मारण्‍याचीही धमकी मिळत आहे.


  काय आहे फोटोत?
  - लंडनमधील 24 वर्षीय स्‍कारसेट एका बेडवर बसलेली फोटोत दिसत आहे. फुल मेकअप आणि सुंदर हेअरस्‍टाईल करून तिने हातात कप घेतला आहे. सोबतच कॅप्‍शनमध्‍ये तिने लिहिले आहे की, 'सुंदर स्‍माईल, पॉझिटीव्‍ह थॉट्स, पॅनकेक्‍स आणि स्‍ट्रॉबेरीसोबत दिवसाची सुरूवात करणेच सर्वात बेस्‍ट पद्धती आहे.' मात्र या फोटोत टेबलवर एक माऊथवॉश दिसत आहे.


  फोटोवर भडकले यूझर्स, केल्‍या अशा कमेंट्स
  - फोटोवर नाराज झालेल्‍या एका यूझरने या फोटोचा स्‍क्रीनशॉट घेऊन तो ट्विटरवर शेअर केला आहे. यात महिलेला शिव्‍या देत जीवे मारण्‍याची धमकी दिली आहे.
  - फोटोवर दिसत असलेल्‍या प्रमोशनल माऊथवॉशला पाहून स्‍कारलेटचे फॉलोअर्स भडकले आहेत. इतकेच नव्‍हे तर फोटोतील नकली पॅनकेक आणि रिकाम्‍या कपमुळेही त्‍यांनी महिलेला चांगलेच फैलावर घेतले आहे.
  - एका यूझरने लिहिले आहे की, 'हा फोटो पुर्ण फेक आहे. मला समजत नाहीये की, हा फोटो घेण्‍यासाठी जो ड्रामा रचण्‍यात आला त्‍याची सुरूवात पॅनकेकनी करू की त्‍या प्रॉड्क्‍ट्सनी जे फोटोत विशिष्‍ट पद्धतीने ठेवण्‍यासाठी महिलेला पैसे दिले गेले.'
  - एका युझरने म्‍हटले आहे की, ही महिला तरूणींना अवास्‍तविक अपेक्षा ठेवण्‍यासाठी उत्‍तेजित करत आहे.

  महिलेने दिले स्‍पष्‍टीकरण
  - याबद्दल स्‍कारलेटने स्‍पष्‍टीकरण दिले आहे की, मी लोकांनी जीवनात सकारात्‍मक राहावे म्‍हणून हा फोटो पोस्‍ट केला आहे. मला नाही वाटत की, माझ्या या फोटोमुळे कोणत्‍याही तरूणीचे नुकसान होईल.


Trending