आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव हाेत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिला बरेचसे आजार अंगावर काढत असतात. त्यांना खूप त्रास झाला तरच त्या डॉक्टरांकडे जातात किंवा काही महिला घरगुती उपाय करतात. परंतु त्यांना नेमके काय झाले हेच समजत नाही यामुळे मोठ्या आजारांना तोंड द्यावे लागते. आज नवरात्रीच्या चौथ्या दिवशी 'गर्भपिशवी काढावी की काढू नये?' याबाबत महिलांमध्ये काही समज-गैरसमज आहेत त्यासंबंधीची माहितीसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादच्या माजी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना मोहगावकर यांच्याशी संवाद साधला. 


# गर्भपिशवी का काढवी लागते? 
1. हार्मोन्सचे संतुलन िबघडले तर रक्तस्राव अनियिमत होतो रक्तक्षय होतो म्हणून गर्भपीशवी काढावी लागते. 
2. गर्भपिशवीत गाठ झाली असेल तर ती गर्भासारखी वाढत जाते. यामुळे रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो. 
3. महिलांनी वयाची ४० शी गाठली की मािसक पाळीत अनियमितता येते. हा काळ रजोनिवृत्तीचा असतो. काही महिलांना रक्तस्राव जास्त होतो. रजोिनवृत्ती आल्यानंतरही रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे, पोटात दुखणे, गाठ होणे , लघवी करताना त्रास होणे, लैंगिक संबंधाच्यावेळी त्रास होणे यामुळे गर्भाशयाचा कर्कराेग होण्याचा धोका असतो. त्यामुळे गर्भपिशवी काढावी लागते. 


# यामुळे होतो मासिक पाळीचा अनियमितपणा 
> असंतुलित हार्मोन्स 
> कॅन्सर (गर्भपिशवीच्या आतील भागात किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा) 
> टयूमर 


# गर्भपिशवी न काढण्याचे फायदे आणि तोटे
> हार्मोन्सचा असंतुलितपणा काही काळच असतो. तो नियमित होतो. 
> मासिक पाळी गेली की सर्व नाॅर्मल होते आिण रजोनिवृत्ती आली की सर्व साधारण स्थितीला येते यामुळे गर्भपिशवी काढायची गरज पडत नाही. 
> गर्भाशयाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. 
> स्थूलता-अितस्थूलता, वंधत्व, अानुवंशिक, हार्मोनल असंतुलन, उशिरा म्हणजेच वयाच्या ५५ वर्षांनंतर रजोनिवृत्ती आली तर गर्भाशयाचा कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने गर्भपिशवी काढावी. 


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, लक्षणे आणि उपाय...

बातम्या आणखी आहेत...