Home | Khabrein Jara Hat Ke | Woman Rescued After Being Trapped in Bathtub for 5 Days

बाथटबमध्ये अडकली 54 वर्षांची महिला.. 5 दिवस पाणी पिऊन केला जिवंत राहण्यासाठी संघर्ष

दिव्यमराठी वेब टीम | Update - Nov 09, 2018, 03:42 PM IST

अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या अॅलिसन गिब्सन ही महिला लठ्ठ आहे.

 • Woman Rescued After Being Trapped in Bathtub for 5 Days

  मिशिगन- अमेरिकेत राहणारी 54 वर्षांची एक महिला तब्बल 5 दिवस घरातील बाथटबमध्ये अडकून होती. या घटनेची माहिती एका पोस्टमनला समजली. तो लेटरबॉक्समध्ये लेटर टाकताना त्याला विचित्र आवाज आला. नंतर त्याने या महिलेविषयी तिच्या शेजारच्यांकडे चौकशी केली. परंतु त्यांच्याकडूनही माहिती न मिळाल्याने त्यांना पोलिसांना सूचीत केले. पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून संबंधित महिलेला बाथटबमधून बाहेर काढले.

  बाथटबमध्ये अडकली होती महिला

  > अमेरिकेतील मिशिगनमध्ये राहणाऱ्या अॅलिसन गिब्सन ही महिला लठ्ठ आहे.

  अॅलिसन नेहमीप्रमाणे 15 ऑक्टोबरला बाथटबमध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. आंघोळ झाल्यानंतर अॅलिसन टबमधूनबाहेर निघण्यासाठी भिंतीवर असलेल्या हॅन्डरेलला पकडण्याचा प्रयत्न करु लागली. परंतु ती बसून आंघोळ करत असल्यामुळे तिला हालचाल करणे अवघड झाले.
  > अॅलिसन नेहमी भिंतीवर असलेल्या हॅन्डरेलला पकडून टबमधून बाहेर निघत होती. परंतु यावेळी अॅलिसन टबमध्ये बसून आंघोळ करत होती. त्यामुळे तिला हॅन्डरेल पकडता आले नाही. ती बाथटबमध्ये अडकून पडली.
  > अॅलिसन ही घरात एकटी होती. बाथरुमधून तिचा आवाज बाहेर जात नव्हता. तिचा फोनही दुसर्‍या रुमध्ये होता.

  पोस्टमनच्या तत्परतेने बचावला अॅलिसन जीव

  > पोस्टमनने तत्परता दाखवली नसती तर कदाचित अॅलिसन बचावली नसती.
  > पोलिस आल्यानंतर त्यांनी खिडकीतून घरात प्रवेश करत बाथरूमचा दरवाजा तोडून अॅलिसनला बाहेर काढले.
  > अॅलिसनने सांगितले की, ती तब्बल पाच दिवस अन्नाशिवाय जिवंत राहिली. टबमध्ये असताना तिला ठंडी वाजत होती. तेव्हा ती गरम पाण्याने आंघोळ करायची आणि तहान लागल्यानंतर थंड पाणी प्यायची.
  > अॅलिसनला बाहेर काढल्यानंतर तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले, डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर ती ठणठणीत असल्याचे त्यांनी सांगितले.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो...

 • Woman Rescued After Being Trapped in Bathtub for 5 Days
 • Woman Rescued After Being Trapped in Bathtub for 5 Days
 • Woman Rescued After Being Trapped in Bathtub for 5 Days

Trending