आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्र साजरे करण्यासाठी गेला होता Couple, रात्री नशेत तर्र असताना हॉटेल मालकासोबत केली अशी डील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ब्रिटनमध्ये राहणारा एक कपल आपले हनीमून साजरे करण्यासाठी श्रीलंकेत गेला होता. परंतु, ते ज्या ठिकाणी थांबले तेथील हॉटेल मालकासोबत नशेत तर्र असताना अशी डील केली की ते कधीच विसरणार नाहीत. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांची नशा उतरली तेव्हा, त्यांना आपण घर आणि देशापासून हजारो किमी दूर काय केले याची जाणीव झाली. परंतु, याच डीलने त्यांचे अख्खे आयुष्य नेहमीसाठी बदलले. तरीही त्यांनी आपला निर्णय बदलला नाही.


काय होती डील?
- ही कहाणी लंडनमध्ये राहणारी टीव्ही प्रोड्युसर गिना लायन्स (33) आणि तिचा दिग्दर्शक पती मार्क ली (35) यांची आहे. ते लग्नानंतर हनीमून साजरे करण्यासाठी ब्रिटनहून श्रीलंकेला गेले होते. गिनाने सांगितले, की मार्क आणि तिची पहिली भेट वर्षभरापूर्वीच झाली होती. दोघांनाही फिरण्याचा छंद होता. रिलेशनशिपमध्ये असताना त्यांनी थायलंड, कंबोडिया आणि व्हिएतनामचे दौरे केले. 
- जून 2017 मध्ये त्यांनी विवाह केला आणि 3 आठवड्यांसाठी श्रीलंकेत फिरण्यासाठी निघाले. यावेळी त्यांनी राहण्यासाठी एक स्वस्त हॉटेल निवडले. तांगाले नावाच्या छोट्याशा आणि समुद्र किनारी असलेल्या शहरात ते पोहोचले. त्या रात्री ते हॉटेलच्या तुटलेल्या टेबल खुर्चीवर बसून रम घेत होते. हे हॉटेल आपले असते तर कसे व्यवस्थित चालवले असते, असे तुटलेले फर्निचर तर मुळीच ठेवले नसते अशी चर्चा त्यांनी सुरू केली. 
- नशेत चर्चा करत असताना आपण ब्रिटनमध्ये राहून सुद्धा श्रीलंकेतील असेच एखादे हॉटेल योग्यरित्या चालवू शकतो असा विचार त्यांना आला. त्याच ठिकाणी राहणाऱ्या इसुरू नावाच्या व्यक्तीशी त्यांनी अशा एखाद्या हॉटेलबद्दल विचारणा केली. तेव्हा आपण बसलात तेच हॉटेल लवकरच विकले जाणार असे त्याने दोघांना सांगितले. 


नशेत त्याच रात्री केली डील, दोघांना नोकरीही दिली...
- हॉटेल विकणार असे समजताच त्यांनी नशेत असतानाही हिशोब लावण्यास सुरुवात केली. मध्यरात्रीपर्यंत त्यांनी बिझनेस प्लॅन देखील तयार केला. हॉटेल लीझवर घेण्यासाठी मालकाला 30 हजार ब्रिटिश पाउंड (30 लाख रुपये) देणार असे ठरवले. मालकाने ती ऑफर सहज स्वीकारली. 
- हॉटेलची डील होताच त्यांनी त्याच रात्री इसुरूवर खुश होऊन त्याला फ्रंट ऑफ मॅनेजरची जॉब दिली. तसेच त्याच ठिकाणी बसलेल्या मेलिंडा हिला हॉटेल मॅनेजर पदी नियुक्त केले. तिने यापूर्वीही एका हॉटेलात व्यवस्थापन केले होते. 
- महिलेने सांगितले, की दुसऱ्या दिवशी त्यांची नशा उतरली तेव्हा मनात खूप संशय आले. आपण केलेली डील चुकीची तर नाही ना असे विचार आले. नशेत आपण एवढी मोठी डील कशी करू शकतो अशा प्रश्नांनी स्वतःबद्दल वाइट वाटत होते. परंतु, अशी ऑफर आयुष्यात नंतर येणार नाही असे म्हणत त्यांनी डील तशीच ठेवण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी 15 लाख रुपये जमा केले. यानंतर 2019 मध्ये उर्वरीत 15 लाख देण्याचा लेखी करार झाला. 
- ब्रिटनमध्ये परतल्यानंतरही त्यांनी त्याच हॉटेलसाठी प्लॅन केले. जास्तीत-जास्त काटकसर करून पैसे त्या हॉटेलच्या डागडुजीसाठी गोळा केले. यासाठी त्यांनी स्वतःच्या पार्ट्या आणि शॉपिंगवर सुद्धा निर्बंध लादले होते. 


दिव्यांगांना दिला रोजगार
- हॉटेल खरेदी केल्याच्या जवळपास एका वर्षानंतर जून 2018 मध्ये ते पुन्हा श्रीलंकेला परतले. इसुरू आणि मेलिंडा हॉटेलची योग्यरित्या काळजी घेत होते. लवकरच त्यांनी हॉटेल रिपेअर केले आणि नवीन बिझनेस सुरू केला. सर्वात महत्वाचे म्हणजे, त्यांनी या हॉटेलात स्थानिक विकलांगांना रोजगार दिला. 
- हॉटेलच्या प्लास्टरिंग, पेंटिंग आणि सजावटीसह फिटिंगचे काम त्यांनी मूक-बधिरांना दिले. त्यांना हातवारे करून किंवा फोटो दाखवून काम सांगितले जायचे. या कार्यांमध्ये इसुरूने त्यांची खूप मदत केली असे या कपलने व्यक्त केले आहे. 
- अखेर त्यांचे हॉटेल नव्या जोमाने सुरू झाले. हॉटेलिंगसह त्यांनी ब्रिटनमध्ये टीव्ही प्रॉडक्शनचे कामही सुरू केले. आता हे हॉटेल त्यांच्यासाठी एक हॉलिडे डेस्टिनेशन आणि साइड बिझनेस असे दोन्ही बनले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...