आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Woman Rickshaw Driver Meets Obama, Participates In Panel Discussion Held In Singapore

रिक्षाचालक महिलेने घेतली ओबामांची भेट, सिंगापूरमध्ये झालेल्या पॅनल डिस्कशनमध्ये नोंदवला सहभाग

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

अनीशा दीक्षित ही रिक्षा चालक महिला सोशल मीडियावर खूप लाेकप्रिय झाली आहे. ती आपले व्हिडिओ करून सोशल मीडियावर टाकत असते. तिचे व्हिडिओ युवकांपेक्षा मुलींना प्रभावित करतात. अनीशा दीक्षित हिने नुकतेच सिंगापूर येथे झालेल्या पॅनल डिस्कशनमध्ये सहभाग नोंदवला आणि अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती बराक ओबामा यांची भेट घेतली. अनीशा दीक्षित म्हणते की, बराक ओबामा यांच्याशी भेट होणे हा माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण होता. त्यांना पाहताच मी म्हणाले, मला तुम्ही आणि मिशेल ओबामा खूप आवडतात. त्यांना मी विशेष धन्यवाद देते की, त्यांच्या प्रेरणेने लाखो लोकांच्या आशा पल्लवीत झाल्या. अनीशाने ओबामांसोबत झालेल्या चर्चेला 'प्रेरणादायक', 'शक्तिशाली' आणि 'जीवन-परिवर्तन' सांगितले. तसेच अनीशा सांगते, महिला सशक्तीकरणावर बोलण्यासाठी युट्युब हे माध्यम एक पर्वणी आणि चांगले माध्यम आहे. यावर मी पूर्ण मनापासून विश्वास ठेवते. मागील सहा वर्षांपासून मी महिला सशक्तीकरणाच्या माध्यमातून आवाज उठवत आहे. अशा काळात मिस्टर बराक ओबामा सारख्या हस्तीसोबत बोलने सन्मानाची गोष्ट समजते. ओबामानी मला दोन महत्वपूर्ण गोष्टी सांगितल्या त्यांची आठवण काढताना अनीशा म्हणते.., ओबामा म्हणाले...,फक्त दोन वर्ष देशाची कमान महिलांच्याहाती दिली किंवा त्यांना कंपनी, संस्था चालवण्यासाठी दिल्यास या देशात कमी लढाया, कमी अहंकार आणि प्रगती होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे. तसेच नवीन आणि युवा नेते बदल घडवून आणतील. तरुण क्रांती करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...