आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यूयॉर्क - अमेरिकेतील एका नाइटक्लबमध्ये हिंदू देवी-देवतांच्या अपमानाचे प्रकरण समोर आले आहे. या क्लबला भेट देणाऱ्या एका भारतीय वंशाच्या तरुणीने केवळ हे प्रकरण समोर आणले नाही. तर या प्रकरणात संबंधित नाइटक्लबला माफी मागण्यासही भाग पाडले. या क्लबमध्ये टॉयलेट-बाथरुमच्या भिंतींवर देवी-देवतांचे फोटो लावण्यात आले होते. सोशल मीडियावर तिने लिहिलेली पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.
> ओहियो प्रांतात राहणारी भारतीय वंशाची तरुणी अंकिता मिश्रा हिने घटनेची सविस्तर माहिती दिली. अंकिता ऑक्टोबर महिन्यात आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी न्यूयॉर्क शहरातील 'हाउस ऑफ यस' नावाच्या एका नाइट क्लबमध्ये गेली होती. याचवेळी ती वॉशरुमला गेली असताना तिला असे फोटो दिसून आले. टॉयलेट बाथरुमच्या भिंतींवर सरस्वती, दुर्गा, महाकाली, भगवान शिव आणि गणेशाचे पोस्टर होते. यापैकी काही पोस्टर टॉयलेट सीटजवळ सुद्धा होते. तिने टॉयलेट वापरले नाही आणि तेथून निघून आली.
> यानंतर तिने सोशल मीडियावर #MyCultureIsNotYourBathroom या नावाने मोहिम सुरू केली. आपला अनुभव शेअर केला. तिच्या पोस्टला उदंड प्रतिसाद मिळाला. एवढेच नव्हे, तर तिने नाइटक्लबच्या मालकाला ई-मेल करून याबद्दल सांगितले. तिच्या पोस्टवरून अनेकांनी क्लबला ई-मेल आणि पत्र पाठवून त्यांच्या चुकीची जाणीव करून दिली. अखेर आपल्या क्लबने सर्वच पोस्टर काढून जाहीर माफी मागितली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.