आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Woman Shocked To See Soldier Standing In Attention Position In Heavy Rain, Shocked When She Discovered The Reason

जवानाने ऐन रस्त्यात रोखली गाडी, भरपावसात सावधान मुद्रेत राहिला उभा, पाठीमागून येणाऱ्या अनेक गाड्यांना लावावे लागले ब्रेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिका - अमेरिकेच्या केंटुकीमधील रस्त्यावर एक आर्मी जवान अचानक गाडी रोखतो. भरपावसात त्याने गाडी रोखताच पाठीमागून येत असलेल्या एका महिलेलाही तिची कार थांबवावी लागते. महिला पाहते की, फौजी भरपावसात सावधान मुद्रेत रस्त्याच्या मधोमध उभा आहे. हे पाहून महिला चिडते. तिला कळत नाही की, तो जवान असे का करत आहे? परंतु लवकरच तिच्या समोर सर्व सत्य स्पष्ट होऊन जाते.

 

- एरिन हेस्टर नावाच्या महिलेने या फोटोसोबत एक भावुक करणारी पोस्ट आपल्या फेसबुक अकाउंटवरून शेअर केली आहे. महिलेने लिहिले, आधी तर मला त्या जवानाने अचानक गाडी थांबवल्यामुळे राग आला होता.

 

- मग मी पाहिले  की, भरपावसात तो जीपमधून उतरून सावधान मुद्रेत उभा राहिलाय. मी काही विचार करणार तेवढ्यात माझी नजर डाव्या बाजून जाणाऱ्या एका गाडीवर गेली. ती एक शववाहिनी होती. त्यात एका व्यक्तीला अंत्यसंस्कारासाठी नेले जात होते.

 

- हे पाहताच मीसुद्धा भावुक झाले. आजच्या काळात एखाद्या शववाहिनीसमोर थांबणे तर दूरच, उलट आपली गाडी पुढे नेण्यातच लोक धन्य मानतात. परंतु लोकांना हे कळत नाही की, मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, यापुढे काहीही नसते. फौजीने ज्या प्रकारे उभे राहून मृतात्म्याचा सन्मान केला, ते खूप हृदयस्पर्शी होते. मी स्वत: त्याला सलाम करत निघाले.

 

परंतु जवानाने असे का केले?
- एरिन जवानाचे असे कृत्य पाहून खूप प्रभावित झाली. तिला वाटले, बहुधा लष्करात असा एखादा नियम असेल, ज्यात अंत्ययात्रा दिसताच सम्मान देत असतील. परंतु तिला अशी कोणतीही माहिती मिळाली नाही. एरिनला समजले की, असा कोणताही नियम नव्हता. त्या जवानाने फक्त माणुसकीच्या नात्याने मृतात्म्याला सन्मान दिला होता.

 

सोशलवर शेअर केली कहाणी
- भावुक एरिनने त्या अज्ञात जवानाचा फोटो आणि कहाणी आपल्या मित्रांसोबत शेअर केली. तिने लिहिले, असे लोकही या जगात आहेत, हे मी आज पाहिले. भरपावसात लोक जिवंत माणसासाठी थांबत नाहीत, मग या जवानाने जे केले, त्याच्या कौतुकासाठी शब्द नाहीत. 

 

 

बातम्या आणखी आहेत...