Home | Khabrein Jara Hat Ke | Woman shot dead on street wake up to be taken to morgue

अज्ञात व्यक्तीने महिलेला मारली गोळी, खुप वेळेपर्यंत रस्त्यावर पडला होता मृतदेह, पोलिस शोधत होते पुरावे, घडली विचित्र घटना..

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 15, 2019, 07:51 PM IST

मृतदेहाला शवविच्छेदनाला घेऊन जात असताना झाले असे.

 • Woman shot dead on street wake up to be taken to morgue

  कॅली- कोलंबियामध्ये एका महिलेल्या दिवसाढवळ्या गोळी मारली. रस्त्यावर असलेल्या लोकांना वाटले की, महिलेचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे कोणी तिच्या जवळदेखील गेले नाही. त्यामुळेच पोलिस येईपर्यंत रस्त्यावरच पडला होता मृतदेह. पोलिसांनी घटनास्थळी पोहचले आणि पुरावे शोधू लागले. काही वेळेनंतर महिलेच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवण्याची तयारी होत असतानाच अचानक महिला उठली. हे पाहून पोलिस चकित झाले आणि तिला तत्काळ तिला रूग्णालयात दाखल केले.

  हाताची हालचाल झाली
  - प्रकरण कॅली शहरातले आहे. येथे 33 वर्षीय कॅरमन अँड्रा मेंडेज नावाच्या महिलेल्या कोणीतरी गोळी मारली. तिच्या शरीराची काहीच हालचाल होत नव्हती, म्हणून लोकांना वाटले तिचा मृत्यू झाला आहे.
  - पोलिस घटनास्थळी येईपर्यंत ती रस्त्यावरच पडून होती. काही तासानंतर पोलिसांनी टीम आली आणि घटनास्थळावरून पुरावे गोळा करू लागली.
  - त्यादरम्यान पोलिस महिलेची पोझीशन मार्क करण्यासाठी तिच्या जवळ आले तेव्हा त्यांना तिचा हात हालत असल्याचे दिसले.
  - तेथे उपस्थित असलेल्या एका महिलेने या संपुर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आहे.


  महिलेची प्रकृती स्थिर
  - स्टेट हेल्थ सेक्रेटरी नेल्सन सिनिस्टेरा यांनी सांगितले की, कॅरमनला तत्काळ रूग्णालयात भर्ती करण्यात आले आणि तिच्यावर उपचार सुरू झाले. डॉक्टरांनी तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.
  - हेल्थ सेक्रेटरीने सांगितले की, गोळी महिलेच्या छातीच्या उजव्या बाजुला चाटून गेली होती, तर दुसरी गोळी तिच्या पायावर लागली होती.
  - सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या पोलिस महिलेला शुद्ध येण्याची वाट पाहात आहे.

Trending